कोपरगाव तालुका
महामानवाचे विचारांचे आचरण हीच त्यांना आदरांजली – तहसिलदार योगेश चंद्रे
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी)
डॉ. भीमराव रामजी आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर नावाने ओळखले जात. आंबेडकरांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या दोन्हीतून अर्थशास्त्रातील डॉक्टरेट पदव्या मिळवल्या.आपल्या सुरुवातीच्या कारकिर्दीत ते अर्थशास्त्रज्ञ, प्राध्यापक आणि वकील होते. त्यांनी नंतरच्या जीवनात राजकीय कार्यांवर लक्ष केंद्रित केले ते भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रचार व चर्चांमध्ये सामील झाले, वृत्तपत्रे प्रकाशित करणे, दलितांसाठी राजकीय हक्क व सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला१९५६ मध्ये त्यांनी बौद्ध धम्म स्वीकारला, व लक्षावधी दलितांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. १९५० च्या दशकात बौद्ध भिक्खुंनी त्यांना बोधिसत्व ही बौद्ध धर्मातील उपाधी प्रदान केली. इ.स. १९९० साली त्यांना मरणोत्तर भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान केला.
त्यांचे कार्य आगामी पिढ्यांना प्रेरणादायी रहाणार असून आजच्या पुण्यतिथी निमित्त कोपरगाव तहसिल कार्यालयाचे वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन तहसिलदार योगेश चंद्रे यांचे हस्ते मोठ्या उत्साहात करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.त्यावेळी त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय व्दारा प्रकाशित ‘महामानव’ या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित पुस्तकाचे वितरण तहसिलदार योगेश चंद्रे यांनी कार्यालयीन कर्मचाऱ्यांना केले.