कोपरगाव तालुका
कोपरगाव साठवण तलावाचा बाण लागला कोणाच्या वर्मी !
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगावचे नवोदित आमदार आशुतोष काळे यांनी राज्यात महाघाडीची सत्ता स्थापन झाल्याने कोपरगाव शहराचा प्रलंबित पाणी प्रश्न मार्गी लावण्यासाठी विद्यमान नगराध्यक्ष विजय वहाडणे यांना सोबत घेत येसगाव ग्रामपंचायत हद्दीतील पाच क्रमांकाच्या तलावासाठी प्रयत्न करावे असे आवाहन कोपरगाव नगरपरिषदेचे माजी अध्यक्ष मंगेश पाटील यांनी नुकतेच केल्याने अनेकांचा निळवंडेचा जुना रोग उफाळून आल्याचे दिसत असून या बाबत नेमकी काय स्थिती आहे या बाबत वाचकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण होणे स्वाभाविक आहे.मात्र यापूर्वीही निळवंडे कालवा कृती समितीने उच्च न्यायालयासमोर व अन्यत्र स्पष्टपणे भूमिका बजावली असून वर्तमानात काहींनी पुन्हा एकदा चावळण्यास प्रारंभ केल्याने जनतेला यातील खुबी दाखवून देणे क्रमप्राप्त असून हि शुद्ध दिशाभूल आहे हे पुन्हा एकदा सांगण्यास बाध्य केले जात आहे.या मागे अर्थात कोण आहे.व मंगेश पाटील यांनी उपस्थित केलेला साठवण तलावाचा बाण नेमका कोणाच्या वर्मी लागला आहे ? हे कोपरगाव व शिर्डी करांना वेगळे सांगण्याची गरज नाही.यावर यापूर्वी बराच उहापोह होऊन गेला आहे.त्यावर ओझरता दृष्टिक्षेप.
कोपरगाव नगरपरिषद वर्तमानस्थितीत चार दिवसाआड नागरिकांना पाणी पुरवठा करत आहे.उन्हाळ्यात हेच पिण्याच्या पाण्याचे आवर्तन आठ ते पंधरा दिवसाआड जाते त्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो.कोपरगाव नगरपरिषदेला पाणी कमी नाही मात्र नियोजनाचा अभाव व पाण्याची चोरी,गळती थांबविली तरी हेच 210 द.ल.घ.फूट पाणी पुरु शकते.नव्हे जवळपास चाळीस टक्के शिल्लक राहते हे जलसंपदा विभाग व नगरपरिषदेचा पाणीवापर स्पष्ट दाखवून देत असताना फक्त मात्र मांजराच्या गळ्यात घंटा कोणी बांधावयाची हा खरा प्रश्न आहे.
कोपरगाव नगरपरिषद वर्तमानस्थितीत चार दिवसाआड नागरिकांना पाणी पुरवठा करत आहे.उन्हाळ्यात हेच पिण्याच्या पाण्याचे आवर्तन आठ ते पंधरा दिवसाआड जाते त्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो.कोपरगाव नगरपरिषदेला पाणी कमी नाही मात्र नियोजनाचा अभाव व पाण्याची चोरी,गळती थांबविली तरी हेच 210 द.ल.घ.फूट पाणी पुरु शकते.नव्हे जवळपास चाळीस टक्के शिल्लक राहते हे जलसंपदा विभाग व नगरपरिषदेचा पाणीवापर स्पष्ट दाखवून देत असताना फक्त मात्र मांजराच्या गळ्यात घंटा कोणी बांधावयाची हा खरा प्रश्न आहे.कारण यापूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी मूळ दुखणे एकीकडे झाकून ठेवून मलम शेंडीलाच लावण्याचा प्रयत्न केला होता.याआधी ज्या दुष्काळी शेतकऱ्यांना 48 वर्ष थापा मारून खोटी उदघाटने करून व दर निवडणुकीत त्यांची मते घेऊन पोबारा करणाऱ्यांनी यावेळी विधानसभा निवडणुकी पूर्वी कोपरगाव व शिर्डी शहरातील मतांवर डोळा ठेऊन आपल्या चाली खेळल्या होत्या मात्र सुज्ञ मतदारांनी त्यांची खेळी उधळून लावल्या होत्या.त्याला अद्याप सव्वा महिना उलटला नसताना काही पाळीव भाटांना पुन्हा निळवंडेची उबळ आली आहे. (हि उबळ अर्थातच त्यांनी आपल्या वजीरांच्या आदेशाने केल्या हे सूर्य प्रकाशाइतके स्वच्छ आहे ) शिर्डी नगरपंचायत व येथील साईबाबा संस्थान यांनी आपल्या तलावाला चार कोटी रुपयांचा प्लास्टिकचा कागद टाकून गळती रोकल्याने त्याना साठ दिवस न पुरणारे पाणी आता चार ते पाच महिने पुरत असताना काहींना निळवंडेवर चालणारी आपली दुकाने बंद होण्याची भीती वाटत आहे.
सन-2011 साली नांदूर मधमेश्वर उंचावणी बंधाऱ्यातून बंद जलवाहिणीद्वारे पाणी आणण्याचे 89 कोटींच्या योजनेवर बरेच चर्वितचर्वण होऊन त्याची निविदा प्रसिद्ध करण्याची काय तेवढी बाकी होती.त्यावर कोपरगावच्या माजी म्हसुलमंत्र्यांनी ती योजना थांबवली होती.कारण पिण्याचे आवर्तन जर गोदावरी कालव्यां ऐवजी बंदिस्त जलवाहिनी द्वारे आणले तर कालव्यांखालील शेती धोक्यात येईल.नजीकच्या विहिरींची वाढणारी भूजल पातळी घटून जाऊन गोदावरी डावा व उजवा कालव्यांखालील शेतीक्षेत्र संपुष्टात येईल हे त्यांनी दूरदृष्टीने ओळखले होते.
नुकत्याच संपन्न झालेल्या निवडणुकीत विजयी झालेले आ. आशुतोष काळे यांनी आपण कोपरगावचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी पाच क्रमांकाच्या तलावाचे काम करणार असे जाहीर केल्याने बऱ्याच पोटभरू बोरूबहाद्दरांचे पोटात खोलवर दुखण्यास लागले आहे.त्यामुळे आता कुठलीही निवडणूक नसताना त्याना पुन्हा आपले दुकान थाटावे वाटू लागले आहे.कारण या संघर्षातून निर्माण होणाऱ्या धगीवर त्यांच्या चुली पेटत असतात हे कोपरगावची जनता ओळखून आहे. नांदूर मधमेश्वर उंचावणी बंधाऱ्यातून बंद जलवाहिणीद्वारे पाणी आणण्याचे 89 कोटींच्या योजनेवर बरेच चर्वितचर्वण होऊन त्याची निविदा प्रसिद्ध करण्याची काय तेवढी बाकी होती.त्यावर कोपरगावच्या माजी म्हसुलमंत्र्यांनी ती योजना थांबवली होती.कारण पिण्याचे आवर्तन जर गोदावरी कालव्यां ऐवजी बंदिस्त जलवाहिनी द्वारे आणले तर कालव्यांखालील शेती धोक्यात येईल.नजीकच्या विहिरींची वाढणारी भूजल पातळी घटून जाऊन गोदावरी डावा व उजवा कालव्यांखालील शेतीक्षेत्र संपुष्टात येईल हे त्यांनी दूरदृष्टीने ओळखले होते.मात्र काही अर्धवट पत्रपंडित नको ते सल्ले देऊन जनतेत संभ्रम निर्माण करून जनतेत वैचारिक दुफळी माजविण्याचा अश्लाघ्य प्रयत्न करत आहे.
नांदूर मधमेश्वर प्रकल्पातून शिर्डी-कोपरगाव या शहरांना पाणी आणल्यास ते विजेच्या खर्चाशिवाय प्रवाही सिंचनाने येणार आहे.शिवाय कालव्यालगत वेगळे भूसंपादन करण्याची आवश्यकता नाही.हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे.तरीही काही मंडळी झोपेचे सोंग घेऊन पेडगावला जायला निघाली आहे.वास्तविक हे पढीक पोपट जनतेचे दुहेरी नुकसान करत असून त्यांना मूळ मार्गापासून भरकटविण्याचे पातक करत आहे.कारण नांदूर मधमेश्वर जलवाहिनी या दोन्ही शहरास आणल्यास साई संस्थांनचे थोडेथिडके नव्हे तर हजार कोटी रुपये वाचणार आहे.
नांदूर मधमेश्वर प्रकल्पातून पाणी आणल्यास ते विजेच्या खर्चाशिवाय प्रवाही सिंचनाने येणार आहे.शिवाय कालव्यालगत वेगळे भूसंपादन करण्याची आवश्यकता नाही.हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे.तरीही काही मंडळी झोपेचे सोंग घेऊन पेडगावला जायला निघाली आहे.वास्तविक हे पढीक पोपट जनतेचे दुहेरी नुकसान करत असून त्यांना मूळ मार्गापासून भरकटविण्याचे पातक करत आहे.कारण नांदूर मधमेश्वर जल वाहिनी या दोन्ही शहरास आणल्यास साई संस्थांनचे थोडेथिडके नव्हे तर हजार कोटी रुपये वाचणार आहे.मात्र ज्यांचा या कोटींवर व आपल्याला मिळणाऱ्या ज्यांनी झोपेचे सोंग घेतले त्यानां तुम्ही कुंभकर्णासारखे त्यांच्या कानाजवळ ढोल वाजवले तरी ते उठणार थोडेच आहे.त्यांचा कोपरगावला पाणी देण्या ऐवजी साई संस्थानच्या मिळणाऱ्या दलालीवर डोळा आहे त्यानां तुम्ही कितीही समजावले तरी ते झोपेतून उठणार थोडेच आहे ! माजी अध्यक्ष मंगेश पाटील यांनी साठवण तलाव क्रमांक पाच व नांदूर मधमेश्वर जलवाहिणीचा प्रश्न उपस्थित केल्याने रग कोणाला लागली आहे हे न समजण्या इतकी जनता अडाणी नाही.त्यांचा नेमका बाण वर्मी लागल्याने त्यांनी आता या पोपटांना पुढे करून आपल्या चाली पुन्हा एकदा खेळण्यास प्रारंभ केला म्हणण्यास मोठी जागा आहे हे सुज्ञास सांगणे न लगे.19 जुलै 2019 रोजी राज्य शासनाने एक कायदा करून विपुल खोऱ्यातून पाणी तुटीच्या खोऱ्यात नेण्यास बंदी घातली आहे.या शिवाय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात एक जनहित याचिका दाखल होऊन त्यातही न्यायालयाने सरकारला या बाबत कायदा करण्यास भाग पाडले आहे.हे या अकलेचे दिवाळे निघालेल्या प्रवृत्तीस कोणी सांगावे हा खरा प्रश्न आहे तूर्त इतकेच या निमित्ताने.