जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

डॉ.प्रियांका रेड्डीच्या आरोपिंना फाशी दया-कोपरगावात मागणी

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी)

हैद्राबाद येथील महिला पशुवैद्यक डॉ.प्रियांका रेड्डीच्या आरोपींचा निर्दयी व घृणास्पद प्रकार पाहता या आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी कोपरगाव शिवसेनेच्या महिला विकास आघाडीच्या वतीने कोपरगाव नगरपरिषदेच्या नगरसेविका व महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख सपना मोरे व त्यांच्या सहकारी महिलांच्या वतीने आज सायंकाळी कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे यांना समक्ष निवेदन देताना भेटून केली आहे.दरम्यान या घटनेचा कोपरगाव शहर मुस्लिम संघटनेने निषेध केला असून तशा आशयाचे निवेदन तहसीलदारांना दिले आहे.

२०१६-१७ मध्ये देशभरात ३९०६८ बलात्कारांच्या घटनांची नोंद झाली. यापैकी १६८६३ (४३.२ टक्के) बलात्कार हे १८ वर्षाखालील अल्पवययीन मुलींवर झाले आहेत. १८ ते ३० वयोगटातील मुली हे आरोंपीचे लक्ष राहिले आहेत. तब्बल ४२.१ टक्के बलात्कार या वयोगटातील मुलींवर झाले. तर ६० पेक्षा अधिक वयोगटाच्या ५७ महिला नराधमांच्या अत्याचाराला बळी पडल्या आहेत. ९१ टक्के बलात्कारातील आरोपी ओळखीचे आहे हे विशेष !

मुस्लिम समाज संघटनेच्या वतीने करण्यात आलेल्या निवेदनात या घटनेशी संबंधित आरोपींना लवकरात लवकर कठोर शासन करण्याची मागणी करण्यात आली आहे.यावेळी आयुब शेख अकबर शेख, निसार शेख, आयुब कच्ची,अन्सार शेख,नजीर शेख अब्बास सय्यद, आकीश बागवान,शकील शेख,फकीर महंमद पहिलवान, खालिक कुरेशी,फारुक बागवान, सोनू शेख, सय्यद वायरमन,कलीम शेख,आदी मान्यवर उपस्थित होते.

तेलंगणाच्या राजधानीत पशुवैदयक महिला डॉ.प्रियांका वैद्य यांची गाडी नादुरुस्त झाल्याने त्यांना मदत करण्याच्या बहाण्याने जवळीक साधत चार ते पाच नराधमांनी त्यांच्या असाह्यतेचा गैरफायदा घेत त्यांच्यावर नुकताच बलात्कार करून त्यांना जिवंत जाळण्याचे निर्दयी काम केले असून या घटनेने देशभरात संतापाची लाट उसळली आहे.कोपरगावातही त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटली असून कोपरगाव महिला शिवसेनेच्या महिला आघाडीच्या वतीने आज सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे याना आपल्या मागणीचे निवेदन देण्यात आले त्यावेळी तहसीलदार योगेश चंद्रे यांच्याशी संवाद साधताना हि मागणी करण्यात आली आहे.

सदर प्रसंगी महिला आघाडीच्या शहर प्रमुख राखी विसपुते, उपशहर प्रमुख वैशाली डोखे,अश्विनी होणे,अक्षिता आमले,आकाश कानडे,विजय पवार, संकेत कानडे,विराट नरोडे,निलेश गंगवाल आदी मान्यवर उपस्थित होते.

निवेदनात त्यांनी म्हटले आहे कि,या घटनेने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.महिलांनी या अन्यायाच्या विरोधात किती वेळा न्याय मागायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे.आरोपींना कायद्याचा धाक राहिलेला दिसत नाही.घटना घडल्यानंतर काही दिवस आंदोलने होतात मेणबत्या जाळल्या जातात पुन्हा एखादा गुन्हा घडतो पुन्हा त्याची पुनरावृत्ती घडते असे हे किती दिवस चालणार असा सवाल या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शासनाला विचारला आहे.हे थांबण्यासाठी आता गृह विभागाने कडक कायदे करावे व या घटना रोखव्या असे आवाहनही त्यांनी शेवटी केला आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close