जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावातून दरवाजा तोडून सोयाबीनची चोरी,गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी)

कोपरगाव शहराचे उपनगर असलेल्या म्हसोबानगर येथील गट नं.125/2 मधील घरात ठेवलेल्या साठ पोते सोयाबीन पैकी सुमारे तीस हजार रुपये किमतीचे बारा पोते सोयाबीन अज्ञात चोरट्याने घराचा जाण्याचा दरवाजा तोडून लंपास केल्याची फिर्याद अनिल भगतसिंग सोनवणे यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात नोंदविल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

कोपरगाव नजीक असलेल्या शेतात सोयाबीनचे साठ पोते पीक काढून ते आपल्याच शेतातील घरात सुरक्षितपणे साठवून ठेवलेले होते.तथापि त्यावर चोरांची वक्र दृष्टी पडली असून त्यांनी सोमवार दि.2 डिसेंबरच्या रात्री सात वाजे नंतर ते सकाळी दहा वाजेच्या दरम्यान कधीतरी घराच्या जिन्याचा दरवाजा तोडून साठ पोते सोयाबीन पैकी बारा पोते घेऊन पोबारा केला असल्याचे त्यांच्या आज सकाळी त्यांचा शेतावरील पर्यवेक्षक अर्जुन गोपाळ पवार हे आपल्या शेतातील घरी गेले असता त्यांना शेतमालाचे घराचे जिना तोडलेला आढळला त्यावर हि बाब लक्षात आली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे कि.कोपरगाव शहरातील धारणगाव रस्त्यालगत संभाजी चौक येथे रहिवासी व ठेकेदार अनिल भगतसिंग सोनवणे यांची म्हसोबानगर येथे आपली शेती आहे.या वर्षी त्यांनी शेतात सोयाबीनचे साठ पोते पीक काढून ते आपल्याच शेतातील घरात सुरक्षितपणे साठवून ठेवलेले होते.तथापि त्यावर चोरांची वक्र दृष्टी पडली असून त्यांनी सोमवार दि.2 डिसेंबरच्या रात्री सात वाजे नंतर ते सकाळी दहा वाजेच्या दरम्यान कधीतरी घराच्या जिन्याचा दरवाजा तोडून साठ पोते सोयाबीन पैकी बारा पोते घेऊन पोबारा केला असल्याचे त्यांच्या आज सकाळी त्यांचा शेतावरील पर्यवेक्षक अर्जुन गोपाळ पवार हे आपल्या शेतातील घरी गेले असता त्यांना शेतमालाचे घराचे जिना तोडलेला आढळला असून त्यांनी ठेवलेले सोयाबीनचे पोते मोजून पहिले असता त्यातील अज्ञात चोरट्याने बारा पोत्यांवर आपला हात साफ केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले त्यांनी लागलीच भ्रमंध्वनिवरून या बाबतची खबर शेत मालक अनिल सोनवणे यांना दिली असून त्यांनी घटनास्थळी जाऊन त्याची खातरजमा केली असता ते वृत्त खरे निघाल्याने त्यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गु.र.नं.397/2019 भा.द.वि.कलम 457,380 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार ससाणे हे करीत आहेत.या घटनेने शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close