कोपरगाव तालुका
कोपरगाव पंचायत समितीच्या वतीने पुरस्कार प्राप्त ग्रामसेवकांचा सत्कार
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव पंचायत समितीच्या वतीने नुकताच जिल्हा परिषदेचा “आदर्श ग्रामसेवक पुरस्कार” प्राप्त ग्रामसेवकांचा कोपरगाव पंचायत समितीच्या सभापती अनुसया होन यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात आज दुपारी सत्कार करण्यात आला आहे.
जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडून जिल्ह्यातील ग्रामसेवकांना त्यांच्या कामाची दाखल घेऊन पुरस्कार देण्यात येतात. ग्रामपंचायत विभागाकडून २०१६-१७ आणि २०१७-१८ या दोन वर्षांतील ग्रामसेवक पुरस्कार २५ नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे यांच्या हस्ते वितरित करण्यात आले आहेत.त्यात कोपरगाव तालुक्यातील संग्राम बोर्डे व बी.एम.गुंड यांचा समावेश होता.
जिल्हा परिषदेने नुकतेच जिल्ह्यातील लक्षवेधी ग्रामविकासाचे काम करणाऱ्या ग्रामसेवकांच्या पाठिवर थाप मारली असून त्यांना नुकतेच जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे यांच्या हस्ते “आदर्श ग्रामसेवक पुरस्कार ” प्रदान करण्यात आले आहे.त्यात कोपरगाव तालुक्यातील भोजडे येथील ग्रामसेवक संग्राम बोर्डे व करंजी बुद्रुक येथील ग्रामसेवक बी.एम.गुंड या दोघाना हा पुरस्कार प्राप्त झाला आहे.आज कोपरगाव पंचायत समितीची मासिक बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत या दोन्ही ग्रामसेवकांचा या निमित्ताने सत्कार करण्यात आला.
सदर प्रसंगी कोपरगाव पंचायत समितीच्या सभापती अनुसया होन उपसभापती अनिल कदम,राष्ट्रवादीचे गटनेते अर्जुन काळे पंचायत समितीचे सदस्य बाळासाहेब रहाणे,श्रावण आसने,सौ.जगधने, सौ.दाणे,सुनीता संवत्सरकर, बाजार समितीचे माजी सभापती मधुकर टेके,गटविकास अधिकारी बी.बी.सोनकुसळे ग्रामपंचायत विस्तार अधिकारी सुनील माळी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.