जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात तरुणीची आत्महत्या,अकस्मात मृत्यूची नोंद

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील इंदिरापथ मार्गावर वाणी सोसायटीत रहिवाशी असलेल्या कु. पूजा संजय अरगडे या सतरा वर्षीय तरुणीने काल सायंकाळी ऑनलाइन शिष्यवृत्तीचा अर्ज भरताना झालेल्या चुकीमुळे आपली शिष्यवृत्ती बुडल्याच्या कारणावरून आपल्या घरी कोणी नाही हि संधी साधत काल सायंकाळी साडे पाचच्या सुमारास घराच्या छताला असलेल्या पंख्याला ओढणी बांधून तिच्या साहाय्याने आत्महत्या केल्याने कोपरगाव शहरात खळबळ उडाली आहे.

दरम्यान दुर्घटनाग्रस्त मुलगी कोपरगाव नजीक असलेल्या सहकारी साखर कारखान्यानजीक असलेल्या महाविद्यालयात पदविका करीत असल्याची माहिती प्राप्त झाली असून तिला शिष्यवृत्ती मिळण्यासाठी तिने एक ऑनलाइन अर्ज भरत असताना त्यात एक चूक झाल्याने आपले सत्तर हजारांची शिष्यवृत्ती बुडेल या भीतीने तिने आपले जीवन संपविले असल्याची खात्रीलायक माहिती प्राप्त झाली आहे.या घटनेने कोपरगाव शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे कि,कोपरगाव न्यायालयात दुर्घटनाग्रस्त मुलीचे वडील नोकरीस असून ते काल सकाळी आपल्या कर्तव्यावर गेले असताना घरी सदर मुलगी व तिची आई या दोघीच होत्या तथापि तिच्या आईने सांयकाळी पाच वाजेच्या सुमारास तिच्या वडिलांना भ्रमनध्वनिवरून,” आपण बाजारात चाललो असून तुमचे कार्यालय बंद झाल्यावर तुम्ही मला बाजारात घेण्यासाठी या” असे सांगितले होते त्या प्रमाणे ते दोघे आपली कामे आटोपून घरी आले असता घराचा दरवाजा त्याना बंद आढळला त्यांनी आपल्या मुलीला हाक मारून प्रतिसादाची वाट पहिली मात्र आतून काहीही प्रतिसाद आला नाही.

आत्महत्येचे विचार मनामध्ये येण्यामागच्या मानसिक कारणांमध्ये औदासीन्य (डिप्रेशन) व व्यसनाधीनता हे मानसिक आजार प्रमुख आहेत. त्याचबरोबर व्यक्तीच्या स्वभावातील उतावळेपणा व अस्थिर स्वप्रतिमा हीदेखील दोन महत्त्वाची मानसिक कारणे आहेत.सामाजिक कारणांमध्ये शेतीमालाच्या अस्थिर भावामुळे होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या अथवा परीक्षा पद्धतीच्या ताणाने होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्या या गोष्टी येतात. जैव-मनो-सामाजिक यांतील एकाच एका कारणाने व्यक्ती आत्महत्या करायला प्रवृत्त होते असे नसून, या तिन्ही गोष्टींच्या कमी-अधिक संयोगामधूनही व्यक्तीच्या मनामध्ये आत्महत्येचे विचार येतात.

त्यामुळे त्यांनी तिच्या भ्रमनध्वनिवरून संपर्क साधून पहिला असता त्यालाही आतून प्रतिसाद आला नाही.तिचा भ्रमणध्वनी बंद असल्याचे आढळून आले.दरम्यान या वसाहतीतील आसपासचे नागरिक जमा झाले त्यांनी घराचे निरीक्षण केले असता त्यांचा एक दरवाजा उघडता येईल असा असल्याने त्यांनी तो उघडून आत डोकावून पहिले असता सदर मुलीने घराच्या छताला ओढणी बांधून तिच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे लक्षात आले.आतील घराचा दरवाजा बंद असल्याने त्यांनी शहर पोलीस ठाण्यात संपर्क साधला पोलिसांच्या समक्ष लोखंडी दरवाजाचे गज कापून तिला खाली उतरून उपचार्थ कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात भरती केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले.या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची आपल्या दप्तरी नोंद केलीय असून पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.आर.पी.पुंड हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close