कोपरगाव तालुका
अजित पवार यांच्या हस्ते काळे कारखान्याच्या झेड.एल.डी. प्रकल्पाचा कार्यक्रम रद्द !
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी)
सहकारी साखर कारखानंदारीत अग्रगण्य असणाऱ्या कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या आसवणी विभागाच्या झेड.एल.डी. (डिस्टीलरी स्पेंटवॉश झिरो लिक्वीड डिस्चार्ज) या प्रकल्पाचे उद्घाटन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते, आज मंगळवारी दुपारी 3 वाजता संपन्न होणार होता मात्र राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी राज्याच्या मंत्रिमंडळाची विस्तार करण्यासाठी अचानक एक बैठक लावल्याने त्या बैठकीस माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती अपरिहार्य बनल्याने त्यांना कोळपेवाडी येथील हा कार्यक्रम रद्द करावा लागला असल्याची माहिती कारखान्याचे उपाध्यक्ष पद्मकांत कुदळे यांनी दिली आहे.हा कार्यक्रम माजी आ.अशोक काळे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच आ. व कारखान्याचे अध्यक्ष आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार होता.आता पुढील कार्यक्रम त्यांची पुन्हा तारीख घेतल्यांनंतर जाहीर करण्यात येणार आहे.