जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावातील ‘त्या’गुंडांना हद्दपार करा-मागणी

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील १०५ हनुमान नगर या उपनगरातील रहिवासी असलेली आपली मुलगी आपल्या अंगणातील पाणी झाडून लोटत असताना त्याला त्याच भागातील आरोपी अमजद जाफर मन्यारसह सहा जणांनी त्याला हरकत घेऊन आपल्या मुलीस लोखंडी गजाने मारहाण केल्याची फिर्याद मुलीची पस्तीस वर्षीय आई यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल केल्याने शहरात खळबळ उडाली असून.या घटनेत महिलेची मुलगी गंभीर जखमी झाली असून या घटनेत या आरोपीनी आक्षेपार्ह कृती करून आपल्या कुसंस्काराचे अभद्र प्रदर्शन केले आहे.या गंभीर घटनेचे पडसाद उमटले असून नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी या सर्व आरोपींना हद्दपार करा अशी मागणी करून या पीडित कुटुंबाची बाजू घेतली आहे.त्यामुळे त्यांचे सर्वत्र स्वागत होत आहे.मात्र अन्य पक्ष व नेते यांनी गुपचिळीचे धोरण घेतल्याने शहरात आश्चर्य व्यक्त होत आहे.

“गरीब महिलेवर हल्ला करण्याचा भ्याडपणा करून कुणीही स्वतःला डॉन समजू नये.गुंड पुंड वठणीवर आणण्याचे काम कायदा तर करीलच,पण कोपरगावचे नागरिकही अशांचा बेत पाहतील हे गुंडगिरी करणाऱ्यानी लक्षात घ्यावे.पोलीस खात्यानेही जात धर्म न बघता कठोरपणे कारवाया कराव्यात.तरच शहरातील सामाजिक स्वास्थ्य टिकून राहिल.महिला-मुलींवर हात टाकण्याचा नामर्दपणा सहन केला जाणार नाही”-विजय वहाडणे,अध्यक्ष,कोपरगाव नगरपरिषद.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील १०५ हनुमान नगर या उपनगरातील रहिवासी असलेली फिर्यादी महिलेची मुलगी हि आपल्या अंगणातील पाणी झाडून लोटत असताना त्याला त्याच भागातील आरोपी अमजद जाफर मन्यार,आवेज अमजद मनियार,रुबीना समजत मणियार,उजमा मनियार,जेबिन जरा मनियार,सोनू जलार मणियार आदींनी हरकत घेऊन आपल्या मुलीस लोखंडी गजाने मारहाण केल्याची फिर्याद मुलीची आईने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल केल्याने शहरात खळबळ उडाली होती.या घटनेत महिलेची मुलगी गंभीर जखमी झाली आहे.आरोपी अहमद मण्यार याने फिर्यादी महिलेची साडी फेडून हाथ धरून या महिलेच्या इज्जतीला हात घातल्याचा व लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याचा गंभीर आरोप केला आहे.या बाबत फिर्यादी महिलेने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान या घटनेत फिर्यादी महिलेची मुलगी हि जखमी झाली आहे.यावर कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वाहाडणे यांनी आज एक प्रसिद्धी पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.

त्यात त्यांनी पुढे म्हटले आहे की,”कोपरगाव शहरातील हनुमान नगर या भागात काही गुंडांनी प्रमोद आरणे यांच्या घरावर हल्ला करून दहशत निर्माण केली.शेजाऱ्यांशी कुणाचेही कितीही वाद झाले तरी अशा प्रकारे अमानुषपणे मागास वर्गीय समाजाच्या कष्टकरी कुटुंबाच्या घरावर जमाव घेऊन जाणे व महिलांना लोखंडी कांब वापरून जखमी करणे हा अत्यंत क्रूरपणा आहे.कायदे,पोलीस स्टेशन यांचा धाक संपला कि काय? असा सवाल उपस्थित करून व्याजाचा बेकायदेशीर धंदा करून शहरात कुणी कायदा हातात घेणार असतील तर ते सहन केले जाणार नाही.अशा माजलेल्या गुंडगिरीमुळे शहरात जातीय धार्मिक तेढ निर्माण होऊन वातावरण बिघडू शकते याची संबंधितांनी गंभीर नोंद घ्यावी.गुंड मुस्लिम असो कि हिंदु त्याला वठणीवर आणलेच पाहिजे.शहरात अवैध धंदे वाढल्याची सर्वत्र चर्चा आहे.कष्ट न करता हाती पैसा आला तर गुंडगिरी नक्कीच फोफावते.अवैध धंदेवालेच शहरातील कायदा सुव्यवस्था धोक्यात आणतात हाच शहराचा अनुभव आहे.वातावरण अजून बिघडू द्यायचे नसेल तर महिलांवर हल्ला करणाऱ्याना हद्दपार करणेच योग्य होईल.गरीब महिलेवर हल्ला करण्याचा भ्याडपणा करून कुणीही स्वतःला डॉन समजू नये.गुंड पुंड वठणीवर आणण्याचे काम कायदा तर करीलच,पण कोपरगावचे नागरिकही अशांचा बेत पाहतील हे गुंडगिरी करणाऱ्यानी लक्षात घ्यावे.पोलीस खात्यानेही जात धर्म न बघता कठोरपणे कारवाया कराव्यात.तरच शहरातील सामाजिक स्वास्थ्य टिकून राहिल.महिला -मुलींवर हात टाकण्याचा नामर्दपणा सहन केला जाणार नाही.अपक्ष नगरसेवक मेहमूद सय्यद यांनी या घटनेचा निषेध करून योग्य भूमिका घेतली आहे.पण स्वतःला समाजसेवक म्हणविणारे स्वयंघोषित समाजसेवक मात्र का गप्प आहेत हे समजत नाही.तालिबानींचा निषेध केला तरी काहींना राग येतो हेही आपल्या शहरासाठी आश्चर्यकारक व घातकच आहे.शहरातील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी गुंडगिरी व अवैध व्यवसाय यांचा बंदोबस्त केलाच पाहिजे असे आवाहनही नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी शेवटी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close