खेळजगत
कोपरगावात ‘राष्ट्रीय क्रीडा दिन’उत्साहात संपन्न

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
श्रीमान गोकुळचंदजी विदयालय च्या वतीने मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून विदयालयात उत्साहाने संपन्न झाला आहे.या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन विदयालयांचे मुख्याध्यापक मकरंद को-हाळकर हे उपस्थित होते.तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणुन भारतीय आॕलिंपिक असोसिएशनचे सहसचिव नामदेवराव शिरगांवकर हे आॕनलाईन उपस्थित होते.
“नुकत्याच संपन्न झालेल्या आॕलिपिंक मधील भालाफेकीतील सुवर्ण व अॕथलेटीक मधील रौप्यपदक मेंजर ध्यानचंद यांना श्रध्दांजली ठरेल.मेजर ध्यानचंद यांचे हाॕकी खेळातील योगदान अविस्मरणीय आहे.आज क्रीडा क्षेत्रातील मोठा दिवस आहे यातुनच खेळाडुंनी प्रेरणा घेवुन आपल्या आवडत्या खेळात देशाला पदके मिळवुन दयावी”-नामदेव शिरगावकर,सहसचिव-भारतिय आॕलिंपिक असोसीएशन.
क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक वर्षी देशात 29 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो.हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची जयंती राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरी करण्यात येते.कोपरगावात श्रीमान गोकुळचंद विद्यालयात हा क्रीडादिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.
या प्रसंगी विदयालयांचे उपमुख्याध्यापक रवि पाटील,पर्यवेक्षक आर.बी.गायकवाड,दिलीप तुपसैंदर,अमृतकर ए.बी,काले ए.के,विरकर डी.व्ही,डी. पी.कुडके,के.एन.बडजाते,ए.जे.कोताडे आदी शिक्षक व विदयार्थी आॕनलाईन या वेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या आरंभी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पुजन विदयालयांचे मुख्याध्यापक मकरंद को-हाळकर यांचे हस्ते करण्यात आले.उपमुख्याध्यापक रवि पाटील यांनी सर्वाचे स्वागत केले.
या प्रसंगी कु.नेहा भोसले,कल्याणी खैरनार,कु.तनया संत यांनी खेळातील शारीरिक क्षमतेचे महत्व सांगितले.श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांचे चेअरमन चंद्रकांत ठोळे,कोपरगांव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष कैलास ठोळे,सचिव दीलीप कुमार अजमेरे व सहसचिव सचिन अजमेरे यांनी राष्ट्रीय क्रीडा दिना निमित्त सर्वाना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्तविक श्रीमान गोकुळचंद विदयालयाचे उपमुख्यापक रवी पाटील यांनी केले.करुन खेळाडु,तर सुत्रसंचलन क्रीडा शिक्षक एन.के.बडजाते यांनी तर आभार ए.के.काले यांनी मानले.या कार्यक्रमाला विद्यालयांतील सर्व शिक्षक तसेच क्रीडा शिक्षक,मार्गदर्शक,क्रीडा प्रेमी खेळाडू आॕनलाईन उपस्थित होते.