जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आरोग्य

कोपरगावातील पोहेगाव जि.प.गटात मोठी रुग्णवाढ सुरूच

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनीधी)

कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव जिल्हा परिषद गटातील कोरोना रुग्णांची वाढ अद्याप सुरूच असून आज आलेल्या अहवालात काकडी-०२,मल्हारवाडी-०१,डांगेवाडी-०५,सोयगाव-०२ पोहेगाव व जवळके प्रत्येकी ०१ असे १२ रुग्ण तर सुरेगाव-०२,कासली-०३,घोयगाव-०४,सावळगाव-०१,टाकली-०१,सुरेगाव-०२,दहिगाव-०१,कोकमठाण-०१,वेळापूर-०१,कोरोना बाधित आढळले आहे.तर कोपरगाव शहर-०४ असे तालुक्यात एकूण ३२ रुग्ण आढळले असल्याने खळबळ उडाली आहे.

कोपरगाव तालुक्यात आज एक अखेर १३ हजार ६७८ बाधित रुग्ण आढ आढळले असून त्यातील १५९ रुग्ण सक्रिय आहे.तर आज पर्यंत २१४ जणांचा बळी गेला आहे.त्याचे प्रमाण टक्केवारीत १.५६ टक्के आहे.तर आज अखेर एकूण ०१ लाख ५५ हजार ३१५ नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे.त्याची दर दहा लाखाला आकडेवारी ०६ लाख २१ हजार २६० इतकी आहे.त्याचा बाधित दर हा ०८.८१ टक्के आहे.तर आज अखेर उपचारानंतर १३ हजार ३०५ रुग्ण बरे झाले आहे.त्यांचा आकडेवारीत दर ९७.२७ टक्के असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी कृष्णा फुलसुंदर यांनी दिली आहे.

राज्यात कोरोनाचा कहर आता अलीकडील काळात अधिक वेग घेताना दिसत येत सरकारने आता पुन्हा एकदा दुकांनाचाही वेळ वाढवून ती रात्री दहा वाजेपर्यंत केली असून कोपरगावातून आज आलेल्या अहवालात ५६० रॅपिड टेक्स्ट करण्यात आल्या असून त्यात ०३ रुग्ण बाधित आढळले असून ५६३ निरंक आढळले आहे.तर नगर येथे ४६० स्राव तपासणीसाठी पाठवले असून आर.टी.पी.सी.आर.तपासणीत २५ तर अँटीजन तपासणीत ०३ खाजगी प्रयोग शाळा तपासणीत ०४ असे एकूण अहवालात बरीच वाढ होऊन एकूण ३२ रुग्ण या मोठ्या विश्रांतीनंतर पहिल्यांदा बाधित आढळले आहे.तर १४ जणांना उपचारानंतर सोडून देण्यात आले आहे तर आज कोपरगाव शहर व तालुक्यात एकाचाही मृत्यू नोंदवला गेला नाही.तथापि कोरोना रुग्णांत नैऋत्येकडील गावात मोठी रुग्णवाढ झाली असून ती लक्षणीयरीत्या मानली जात आहे.याबाबत तालुका वैद्यकीय अधिकारी संतोष विधाते यांचेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो स्थापित झाला नाही.

दरम्यान नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ०३ लाख ०६ हजार ८३८ झाली असून सक्रिय रुग्ण संख्या ०५ हजार २६७ झाली आहे.तर आज अखेर पर्यंत ०२ लाख ९५ हजार ०४६ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहे.तर ०६ हजार ५२४ रुग्ण आतापर्यंत दगावले आहे.दरम्यान आता नागरिक मुक्तपणे फिरण्याचा आनंद घेताना दिसत असून बरेच जण कोरोनाची साथ गायब झाल्याच्या अविर्भावात वावरताना दिसत आहे.लग्न,दहावे,तेरावे,सुपारी आदी कार्यक्रम जोरात सुरु असल्याने कोरोनाचा विषाणू पुन्हा उचल खाण्याच्या तयारीत तालुक्यासह राज्यात आणि देशात कोरोना पुन्हा उचल खाण्याच्या तयारीत आहे.त्यातून त्या बाबत केंद्र सरकारने राज्यांना दक्षतेचा इशारा दिला आहे.दुकाने पुन्हा रात्री दहा पर्यंत सुरु ठेवण्यास प्रारंभ केला आहे.त्यामुळे कोरोना रुग्ण बऱ्याच अंशी पुन्हा वाढु लागले आहेत. कोपरगाव तालुक्यातील काकडी,मल्हारवाडी,डांगेवाडी,पोहेगाव,मनेगाव आदी ठिकाणी रुग्ण लक्षणीयरित्या वाढले आहे हि चिंतेची बाब आहे.याबाबत प्रशासनाला तातडीने पावले उचलावी लागतील अशी चिन्हे आहेत.त्या दृष्टीने आरोग्य विभागाने हालचाली सुरु केल्या आहेत.मात्र त्याची माहिती उपलब्ध झाली नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close