जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव पालिकेने तीन वर्षात 3.11 कोटींची थकबाकी भरून दंड,व्याज वाचवले-विजय वहाडणे

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी )

कोपरगाव नगरपरिषदेने आपल्या तीन वर्षाच्या कालखंडात विकास कामांबरोबरच नगरपरिषदेच्या साठवर्षाच्या कालखंडातील 8 कोटी 83 लाख 13 हजार 899 रुपयांच्या थकबाकी पैकी 3 कोटी अकरा लाख 13 हजार 899 रुपयांची वीज व पाणी पट्टीची थकबाकी भरली असताना अजूनही विरोधक विधानसभा निवडणूक होऊनही त्यांच्या पराभवाला आम्हाला दोषी धरून नगरपरिषदेची बदनामी करत असल्याचा गंभीर आरोप कोपरगाव नगर परिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केला आहे.

महावितरणची एकूण देणी तीन वर्षांपूर्वी 2 कोटी 63 लाख रुपयांची होती ती आपण तीन वर्षात 1 कोटी 91 लाख 14 हजार 458 रुपयांचा भरणा करून पालिकेचा दंड व व्याज वाचवले आहे.या शिवाय जलसंपदाची पाणी पट्टी अनेक वर्षांपासून थकीत होती ती तीन वर्षांपूर्वी आपण कार्यभार स्वीकारताना 6 कोटी 19 लाख 99 हजार 441 रुपये इतकी विक्रमी होती याला प्रथम जबाबदार कोण हे आरोप करणाऱ्यानी स्पष्ट करावे. पालिकेचा खडखडाट या मंडळींनी करून उलट बोंबा मारण्याचे काम सुरु केले आहे. आपण जलसंपदाची हि थकबाकी गत तीन वर्षात 1 कोटी 19 लाख 99 हजार 441 रुपयांनी कमी करून जनतेचे पैसे वाचविले आहे-वहाडणे

राज्याच्या विधानसभेची निवडणूक संपन्न होऊन एक महिन्याचा कालखंड संपन्न झाला आहे.निवडणुका या वैचारिकतेवर लढविणे आवश्यक असताना व त्या संपल्या असताना प्रस्थापितांना जनतेने आपल्याला दिलेले नगराध्यक्ष पद रुचलेले नाही.त्यामुळे नोव्हेंबर 2016 पासून काही प्रस्थापितांना आपण संताजी-धनाजी सारखे पाण्यातही दिसू लागलो आहोत.नुकत्याच संपन्न झालेल्या निवडणुकीतही सत्ताधाऱ्यांनी आपल्या भोवतीच पिंगा घालून आपल्याला बदनाम करण्याचे षडयंत्र राबवून इमाने इतबारे त्याची आपल्या साजिंद्या मार्फत व स्वतः मार्फत अंमलबजावणी केली.संपूर्ण निवडणुकीत त्यांनी आपल्या भोवतीच पिंगा घालून मतदारांना त्यांच्या न केलेल्या विकासकामापासून भलतीकडे नेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला मात्र सदरचा डाव मतदारांच्या लक्षात आल्याने त्यांनी आपल्या मतपेटीतून त्यांना चोख उत्तर दिले आहे.एवढा पैशाचा महापूर येऊनही मतदारांनी पैसेवाल्यांचा बेत पाहिला. तरीही काही विघ्न संतोषी मंडळी थांबण्याचे नाव घेत नाही.अद्यापही स्वतःचे नाक कापून दुसऱ्याला अपशकुन करण्याचा प्रयत्न करीत आहे हि बाब दुर्दैवी असून त्यांनी आता आपल्या झालेल्या चुका शोधाव्या तरच पुढील काळ त्याच्यासाठी बरा असू शकतो अन्यथा त्यांना परमेश्वरही वाचवू शकत नाही.

कोपरगाव नगरपालिकेने जी काही कामे केली आहे ती प्रामाणिकपणे केली आहे.त्यामुळे कामांचा दर्जा सुधारला आहे.त्यात टक्केवारी राहिली नसल्याने अनेकांना आपल्या भविष्याची काळजी वाटू लागली आहे.शहरातील अनेकांची दुकाने बंद पडली असल्याने हि मंडळी आपल्या बदनामीला लागली आहे.वास्तविक यांनी जुनी देणी न दिल्याने पालिकेला अनेक वर्ष दंड व व्याजाचा भुर्दंड सोसावा लागला आहे.त्याला जबाबदार कोण आहे.याचा त्यांनी खुलासा करावा.महावितरणची एकूण देणी तीन वर्षांपूर्वी 2 कोटी 63 लाख रुपयांची होती ती आपण तीन वर्षात 1 कोटी 91 लाख 14 हजार 458 रुपयांचा भरणा करून पालिकेचा दंड व व्याज वाचवले आहे.या शिवाय जलसंपदाची पाणी पट्टी अनेक वर्षांपासून थकीत होती ती तीन वर्षांपूर्वी आपण कार्यभार स्वीकारताना 6 कोटी 19 लाख 99 हजार 441 रुपये इतकी विक्रमी होती याला प्रथम जबाबदार कोण हे आरोप करणाऱ्यानी स्पष्ट करावे. पालिकेचा खडखडाट या मंडळींनी करून उलट बोंबा मारण्याचे काम सुरु केले आहे. आपण जलसंपदाची हि थकबाकी गत तीन वर्षात 1 कोटी 19 लाख 99 हजार 441 रुपयांनी कमी करून जनतेचे पैसे वाचविले आहे.वास्तविक या तीन वर्षात आम्हाला या बदमाश व टक्केवाल्याचे खरकटे काढण्यात खर्ची घालवावी लागली असून पालिकेचा दंड व व्याज वाचविले आहे हे ते सविस्तर विसरले आहे. त्यांनी उलट आमचे आभार मानण्याऐवजी ते, “चोर उलट फौजदार को डांटे” या हिंदी म्हणी प्रमाणे उलट आमची बदनामी करण्यास लागले आहेत.या पुढे त्यांनी हे धाडस केल्यास त्यांना त्याच पटीत उत्तर देण्यात येईल असा इशाराही नगराध्यक्ष विजय वाहाडणे यांनी शेवटी दिला आहे.पालिकेची विकास कामे उत्तमपणे सुरु असून त्यास तसूभरही कमतरता आलेली नाही जनतेने या चोरांच्या बोंबाकडे सोयीस्कर दुर्लक्ष करावे असे आवाहनही अध्यक्ष विजय वहाडणे यांनी शेवटी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close