नगर जिल्हा
शालेय विद्यार्थ्यांसाठी सत्कर्म केल्याने मनस्वी आनंद-नीता खोत
संपादक-नानासाहेब जवरे
सावळीविहिर (राजेंद्र गडकरी )
राहाता तालुक्यातील सावळीविहिर बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व हनुमान क्लास शाळेत नवी मुंबई येथिल ओम साई राम सेवाभावी ट्रस्ट यांचे वतीने सर्व 185 विद्यार्थ्यांना एच.पी. कंपनीच्या पिशव्यांचे वाटप मोठ्या उत्साहात करण्यात आले आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका प्रमिला चौधरी या होत्या.
सामाजिक कार्य करणारे हात वर्तमानात कमी होत असताना नवी मुंबई येथील ओम साई राम ट्रस्टने सावळीविहिर बु द्रूक येथे या उपक्रम राबवला आहे.त्यावेळी ट्रस्टच्या अध्यक्ष नीता खोत यांच्या हस्ते शाळेतील सर्व गरजू ,गरीब,होतकरू, विद्यार्थ्यांना काहीतरी मदत करून आधारस्तंभ माणुसकीचा हा ट्रस्ट चा लोगो प्रत्यक्षात उतरविला आहे.
या वेळी जि. प. शाळेत शिक्षण घेतलेल्या अखिलेश गायकवाड याने बाल वैज्ञानिक परीक्षेत अहमदनगर जिल्ह्यात दुसरा क्रमांक व रयत टॅलेंट सर्च परीक्षेत राज्यात सतरावा क्रमांक पटकावला, त्याबद्दल ट्रस्ट च्या वतीने त्याचा गौरव करण्यात आला.
सदर कार्यक्रमात कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य बाळासाहेब जपे,ग्रामपंचायत सदस्य सागर पगारे,नितीन आगलावे,आनंद जपे,शांताराम जपे, अमोल वायकर, योगेश कुर्हे, वैभव सोनवणे, सचिन कुदळे, ऋषिकेश गाडेकर, नितीन सोळसे, पालक वर्ग,शिक्षक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा नीता खोत म्हणाल्या, की ,माझे आईवडील, दैवत सर्वं काही मी साईबाबाना मानते ,श्रद्धा आणि सबुरीचा संदेश घेऊन बाबांचे कार्य ट्रस्ट च्या माध्यमातून चालू आहे ,शाळेतील मुलांना मदत करून त्यांच्या रूपाने मला बाबांचेच दर्शन झाले,यापुढे ही शाळेला शक्य तेवढी मदत करण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले ,तसेच शालेय स्वच्छता , गुणवत्ता आणि शिस्त याविषयी शाळेला व शिक्षकांना शाबासकी दिली.
कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रमिला चौधरी यांनी केले तर आभार पंकज दर्शने यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी रुपाली मंद्रे ,सुचित्रा चवाळे, विद्या गोर्डे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शिक्षक परिषदेचे तालुकाध्यक्ष दत्ता गायकवाड यांनी केले.