जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपगाव तालुक्यातील दिव्यांगाच्या अडचणींनीची आपल्याला जाणीव-..या नेत्यांची संवेदना

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव विधानसभा मतदार संघातील जनतेने मला निवडून दिले त्यामध्ये दिव्यांग बंधू-भगिनींचा देखील समावेश आहे त्यांच्या मदतीसाठी सदैव तयार असून दिव्यांग बंधू-भगिनींना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही आ.आशुतोष काळे यांनी एका कार्यक्रमात बोलताना दिली आहे.

कोणत्याही सरकारी विभागात अपंग, विकलांग, नि:शक्तजन असे शब्दप्रयोग न करता दिव्यांग म्हणावे अशी तंबी राज्य सरकारने पुन्हा एकदा आपल्या सर्व कार्यालयांना दिली आहे.केंद्र सरकराने डिसेंबर २०१६ मध्येच यासंबंधीची अधिसूचना काढलेली आहे,त्याचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१६ मध्ये एका कार्यक्रमात बोलताना अपंगाचा गौरव करताना त्यांना ‘दिव्यांग’ हा शब्द दिला असून त्यांच्यां विविध योजनांवर काम सुरु केले आहे.

कोणत्याही सरकारी विभागात अपंग, विकलांग, नि:शक्तजन असे शब्दप्रयोग न करता दिव्यांग म्हणावे अशी तंबी राज्य सरकारने पुन्हा एकदा आपल्या सर्व कार्यालयांना दिली आहे.केंद्र सरकराने डिसेंबर २०१६ मध्येच यासंबंधीची अधिसूचना काढलेली आहे,त्याचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१६ मध्ये एका कार्यक्रमात बोलताना अपंगाचा गौरव करताना त्यांना ‘दिव्यांग’ हा शब्द दिला. तेव्हापासून अपंग शब्द बंद झाला असून दिव्यांग या शब्दाचा वापर सुरू झाला आहे. २७ डिसेंबर २०१६ रोजी केंद्र सरकारने यासंबंधी अधिसूचना जारी केली आहे.त्यानुसार राज्यातही ‘दिव्यांग’ शब्द वापरणे व त्यांना विविध योजना पोचवणे अपेक्षित आहे.याबाबत कोपरगाव येथे आ.काळे यांनीं काम सुरु केले असून त्यांच्या हस्ते कोपरगाव विधानसभा मतदार संघातील दिव्यांग बंधू-भगिनींना अपंगत्वाचे शासकीय प्रमाणपत्र देण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते.

सदर प्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगूले,पंचायत समिती सदस्य अनिल कदम,दिव्यांग सेनेचे जिल्हाध्यक्ष योगेश गंगवाल,सुनील फंड, मनसेचे तालुकाध्यक्ष अनिल गायकवाड आदींसह दिव्यांग बंधू-भगिनी उपस्थित होते.

त्या वेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”दिव्यांग बंधू-भगिनींना दैनंदिन जीवनात अनेक अडचणीचा सामना करावा लागतो.त्यामुळे या अडचणी दूर करण्यासाठी त्यांना शासनाकडून दिले जाणारे अधिकृत दिव्यांग शासकीय प्रमाणपत्र अत्यंत आवश्यक आहे. या प्रमाणपत्राच्या माध्यमातून दिव्यांग बंधू-भगिनींना शासनाच्या विविध योजनांचा लाभ सहजपणे मिळविता येणे सहज शक्य होते.त्यांना जीवनात येणाऱ्या अडचणी दूर करून शासनाच्या विविध योजनांचे लाभ मिळवून देवून त्यांचे जीवन सुखकर व्हावे यासाठी प्रयत्न करणार आहे.तसेच मतदार संघातील ज्या दिव्यांग बंधू-भगिनींना अपंगत्वाचे शासकीय प्रमाणपत्र घेण्यासाठी कोपरगाव येथे येण्यासाठी दर महिन्याच्या पहिल्या बुधवारी वाहनाची मोफत व्यवस्था करणार असल्याचे त्यांनी शेवटी संगितले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close