जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगावात अवैध वाळू चोरी,२.१५ लाखांचा ऐवज जप्त,दोघांना अटक

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यासह अवैध वाळूचोरी करण्यास जिल्हाधिकाऱ्यांचा प्रतिबंध असतानाही कोपरगाव शहरानजीक टाटा कंपनीच्या (क्रं.एम.एच.२०ए.५८११) या क्रमांकाच्या राखाडी रंगाच्या टेम्पोचा माध्यमातून दीड ब्रास वाळू चोरी करताना हिंगणी येथील आरोपी शुभम राजेंद्र चंदनशीव (वय-२०),सचिन जाधव (पूर्ण नाव माहिती नाही) रा.एस.जी.शाळेचे पाठीमागे या दोघांना तालुका पोलिसानी अटक केली असून त्यांच्यावर कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल फिर्यादी अनिस अब्दुल शॆख यांनी गुन्हा दाखल केला आहे.त्यामुळे वाळूचोरी करणाऱ्यांत खळबळ उडाली आहे.

नगर जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने अवैध रित्या वाळूचोरी करण्यास प्रतिबंध केलेला आहे.तरीही वाळूस मिळणारे सोन्याचे भाव पाहता अनेक तरुणांना या व्यवसायात पडण्याचा मोह आवरत नाही.परिणाम स्वरूप ते अवैध वाळूचोरीच्या गुन्ह्यात अडकताना दिसत आहे.त्यात अनेकांवर गुन्हे दाखल होऊन त्यांना न्यायालयाचे खेटे मारण्याचा अनास्था प्रसंग ओढवत आहे.अशीच घटना धारणगाव शिवारात घडली आहे.

सदरचे सविस्तर्व वृत्त असे की,नगर जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने अवैध रित्या वाळूचोरी करण्यास प्रतिबंध केलेला आहे.तरीही वाळूस मिळणारे सोन्याचे भाव पाहता अनेक तरुणांना या व्यवसायात पडण्याचा मोह आवरत नाही.परिणाम स्वरूप ते अवैध वाळूचोरीच्या गुन्ह्यात अडकताना दिसत आहे.त्यात अनेकांवर गुन्हे दाखल होऊन त्यांना न्यायालयाचे खेटे मारण्याचा अनास्था प्रसंग ओढवत आहे.अशीच घटना रविवार दि.०१ ऑगष्ट रोजी धारणगाव ग्रामपंचायत हद्दीत कोळपेवाडी रस्त्यावर रनशूर यांचे घराजवळ रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास गुप्त खबरीवरून कोपरगाव तालुका पोलिसांनी टाकलेल्या धाडीत हा वाळूचोरीचा प्रकार उघडकीस आला आहे.वरील ०२ लाख रुपये किमतीचा वरील क्रमांकाच्या टेम्पोत सुमारे १५ हजार रुपये किमतीची दीड ब्रास वाळू असा ०२ लाख १५ हजार रुपयांचा अवैज जप्त केला आहे.कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल अनिस शेख यांनी प्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.

कोपरगाव तालुका पोलिसांनी या प्रकरणी वरील दोन आरोपींवर आपल्या दप्तरी गु.र.क्रं.२८९/२०२१ भा.द.वि.कलम ३७९,३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार आर.बी.भालेराव हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close