जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव तालुक्यात प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांची पट्टी भरणे गरजेचे-आवाहन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

“पाणीपुरवठा योजना सुरु होण्यापूर्वी अपेक्षित असलेले नळजोड योजना सुरू झाल्यानंतर जोडले जात नाही तसेच सर्वच नळजोडधारक पाणीपट्टी देखील वेळेवर भरीत नाही त्यामुळे पाणीपुरवठा योजना चालवितांना ग्रामपंचायतीना तारेवरची कसरत करावी लागते व योजनेची दुरुस्ती करतांना देखील अनेक आर्थिक समस्या निर्माण होतात.त्यामुळे पाणीयोजना सुरु झाल्यानंतर सर्वच वाडीवस्तीवरील नागरिकांना या पाणी योजनेचा लाभ देऊन ग्रामपंचायतींनी पाणीपट्टी वसुलीची काळजी घ्यावी असे आवाहन कोपरगावचे आ.आशुतोष काळे यांनी कोकमठाण येथे एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

कोकमठाणच्या पाणी योजनेच्या नवीन तळ्याला जोडणाऱ्या पाईपलाईनचे काम अपूर्ण असल्यामुळे आवर्तन काळात कालव्यातून या तळ्यात पाणी घेण्यासाठी अडचणी येत होत्या.त्याबाबत आ.काळे यांनी जलसंपदा विभागाकडे पाठपुरावा केला होता.त्या पाठपुराव्यातून तळ्यात पाणी घेण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर होऊन पाईपलाईन व चेंबरचे काम पूर्ण करण्यात आले आहे.

मोठी लोकसंख्या व अनेक वाड्यावस्त्या असलेल्या कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण गावाच्या पाणीपुरवठा योजनेच्या तलावात आवर्तनावेळी गोदावरी कालव्यातून पाणी उचलण्याची मोठी अडचण कायमची मार्गी लागली असून नुकतेच या योजनेचे आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात लोकार्पण करण्यात आले आहे.त्यावेळी ते बोलत होते.

सदर प्रसंगी कोपरगाव पंचायत समितीच्या सभापती पोर्णिमा जगधने,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम,गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी,रोहिदास होन,ग्रामपंचायत सदस्य संजय दंडवते,मच्छिंद्र देशमुख,पंकज लोंढे,जॉनी धीवर,अविनाश निकम, बाबासाहेब पवार,मोहनराव गिरमे,सोपानराव काशीद,महेश लोंढे,संतोष लोंढे,ज्ञानेश्वर रक्ताटे, जालिंदर हाडोळे, संजय थोरात,आबा रक्ताटे,गोरख लोहकणे, सुनील लोहकणे,अनंत रक्ताटे,अल्लाउद्दीन सय्यद,सुनील लोंढे,सुनील साळुंके,जीवन प्राधिकरणचे उपअभियंता शेटे,उपअभियंता महेश गायकवाड,शाखा अभियंता पी.ए.कदम,सु.दा.हरदास,कोमोदकर,पोळ,उपअभियंता पाटील,श्रेयस जाधव, हर्षद बुचुडे,ग्रामपंचायत पदाधिकारी व सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.

कोकमठाणच्या पाणी योजनेच्या नवीन तळ्याला जोडणाऱ्या पाईपलाईनचे काम अपूर्ण असल्यामुळे आवर्तन काळात कालव्यातून या तळ्यात पाणी घेण्यासाठी अडचणी येत होत्या. त्याबाबत आ.काळे यांनी जलसंपदा विभागाकडे पाठपुरावा केला होता.त्या पाठपुराव्यातून तळ्यात पाणी घेण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर होऊन पाईपलाईन व चेंबरचे काम पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे यापूर्वी येत असलेल्या अडचणी कायमस्वरूपी संपुष्टात आल्या आहेत. या योजनेचे लोकार्पण करून आ.काळे यांच्या हस्ते या नवीन तळ्यात पाणी सोडण्यात आले आहे.

याप्रसंगी बोलतांना ते म्हणाले की,”या योजनेचे जे काही कामे अपूर्ण आहेत ती कामे तातडीने पूर्ण करून त्यानंतर हि योजना ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित करावी अशा सूचना महाराष्ट्र जीवन प्राधिकरनाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.कोकमठाण व परिसरातील रस्त्यांचा अनुशेष भरून काढण्यासाठी आपण कटिबद्ध आहे.अनेक रस्त्यांची कामे केली आहेत व यापुढे देखील उर्वरित रस्त्यांसाठी निधी देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्तविक उपाध्यक्ष सुधाकर रोहोम यांनी केले तर सूत्रसंचलन जालिंदर हाडोळे यांनी केले तर आभार ग्रामसेवक डी.बी.गायकवाड यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close