जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात शिवसेनेच्या विविध शाखांचे उद्घाटन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त कोपरगाव शिवसेनेच्या वतीने शहरातील निवारा,हनुमाननगर व खडकी भागात जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे व शहरप्रमुख कलविंदरसिंग दडियाल यांच्या प्रमुख उपस्थितीत निवारा,हनुमाननगर खडकी या उपनगरात विविध शाखांचे उद्घाटन मोठ्या उत्साहात करण्यात आले आहे.

“शिवसेना हा महाराष्ट्रातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे.शिवसेनेची स्थापना बाळ ठाकरे यांनी १९ जून १९६६ रोजी केली. मुंबई मध्ये मराठी माणसांवर होणारा अन्याय अत्याचाराच्या विरोधात शिवसेनेची स्थापना झाली.सध्या या या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.त्यांनी आपल्या वाढदिवसानिमित शाखांचे उद्घाटन करण्याचे आवाहन केले होते त्यानुसार कोपरगाव शहरात या शाखांचे उदघाटन करण्यात आले आहे”-कलविंदरसिंग दडियाल,अध्यक्ष कोपरगाव शहर शिवसेना.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस राज्यात मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.त्या निमित्त राज्यात विविध कार्यक्रम शिवसेनेचे पदाधिकारी यांनी आयोजित केले होते.कोपरगावातही विविध ठिकाणी शिवसेनेच्या शाखांचे उदघाटन करण्यात आले आहे.त्यात निवारा,हनुमाननगर खडकी या उपनगरांचा समावेश आहे.विधानसभा संघटक अस्लम शेख व एसटी कामगार सेनेचे शहरप्रमुख भरत मोरे यांनी उपस्थित शिवसैनिकांना सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न शिवसेनेच्या माध्यातून सोडविण्यासाठी तसेच पक्षाचे काम घराघरात पोहोचवण्यासाठी व संघटन वाढविण्यासाठी मार्गदर्शन केले.जेष्ठ शिवसैनिकांनी केलेल्या संघर्षामुळेच आज शिवसेना कोपरगावात टिकून आहे असे मत शहरप्रमुख कलविंदरसिंग दडियाल यांनी व्यक्त केले. सर्व शाखा प्रमुखांचे व पदाधिकाऱ्यांचे सत्कार या प्रसंगी करण्यात आले

सदर प्रसंगी सतिष देशपांडे,विजय मुंगसे,गणेश जाधव,दिलीप उगले,दिगंबर गवळी,शिववाहतूक सेनेचे जिल्हाप्रमुख इरफान शेख,अमजद शेख, उपशहरप्रमुख विकास शर्मा,गगन हाडा,गोपाळ वैरागळ,आकाश कानडे,संघटक बाळासाहेब साळुंके, विशाल झावरे, ग्राहक संरक्षण कक्षाचे राहूल देशपांडे, सतीश शिंगाने, विभागप्रमुख मयुर दळवी,समीर शेख,अक्षय वराडे, प्रमोद बोथरा,गौरव गुप्ता, निशांत झावरे,मंगेश देशमुख,अभिषेक जाधव, गोविंद चव्हाण,शाखाप्रमुख उमेश छुगणी,वैभव हलवाई, मुनीर शेख,उपशाखाप्रमुख सलमान शेख, आदी शिवसैनिक उपस्थित होते.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close