जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात सैनिक भवन आवश्यक…या नेत्याचे आश्वासन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

देशसेवेसाठी सैनिकांनी दिलेल्या बलिदानामुळेच आज सर्वसामान्य माणूस आपल्या देशांमध्ये सुरक्षित असून कोपरगाव तालुक्यातील अनेक सुपुत्रांनी देशसेवेसाठी वाहून घेतलं असुन अनेक शूर जवानांना वीरमरण देखील आले आहे.या सैनिकांप्रती माझ्या मनात नेहमीच आदर भावना असून अनके दिवसांपासून सैनिक भवनसाठी असलेली जागेची मागणी पूर्ण करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही आ. आशुतोष काळे यांनी एका कार्यक्रमात बोलताना दिली आहे.

‘कारगिल युद्ध’आधुनिक इतिहासातील अतिउंचीवरच्या युद्धाचे अत्युत्‍कृष्ट उदाहरण आहे. यात युद्धाला लागणारी सामग्री व मनुष्यबळ ने-आण करण्याचा चांगलाच अनुभव भारतीय सैन्याला मिळाला. हे युद्ध दोन्ही देश अण्वस्त्रसज्ज झाल्यानंतरचे पहिलेच युद्ध होते त्यामुळे सर्व जगाचे लक्ष या युद्धाकडे लागले होते. परंतु भारताने हे युद्ध कारगिलपुरतेच मर्यादित ठेवले होते.

कारगिल युद्ध हे भारत व पाकिस्तान यांच्या दरम्यान सन १९९९ च्या उन्हाळ्यात लढले गेलेले मर्यादित युद्ध होते.या युद्धाची व्याप्ती भारताच्या कारगिल व आजूबाजूच्या परिसरापुरतीच मर्यादित राहिली, त्यामुळे याला मर्यादित युद्ध म्हणतात. तसेच या पूर्वीच्या भारत-पाक युद्धांप्रमाणेच याही युद्धात, युद्ध सुरू झाल्याची व संपल्याची कोणतीही घोषणा करण्यात आलेली नव्हती.उलट पाकिस्तानतर्फे युद्धादरम्यान त्यांचा देश अलिप्त आहे असा कांगावा करण्यात आला होता. पुढे अनेक वर्षांनंतर हळूहळू पाकिस्तान सरकारने व अनेक लष्करी अधिकाऱ्यांनी हे युद्धच होते असे जाहीर केले.या युद्धात अनेक भारतीय जवान शहीद झाले होते.त्यांच्या बलिदानाची देश दरवर्षी दखल घेत असतो.कोपरगावतही हा ‘कारगील विजय दिन’ मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला आहे.

कारगिल विजय दिनानिमित्त आ.काळे यांनी देशासाठी बलिदान देणाऱ्या भारत मातेच्या वीर शहीद जवानांना अभिवादन करून मतदारसंघातील सेवानिवृत्त सैनिक व वीरपत्नी श्रीमती सरला जाधव यांचा सन्मान केला. याप्रसंगी ते बोलत होते.

सदर प्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकरराव रोहोम,सेवा निवृत्त सैनिक संघटनेचे तालुकाध्यक्ष अध्यक्ष युवराज गांगवे,शांतीलाल होन,रामनाथ वर्पे,सचिन चोळके,शहीद जवान अमोल जाधव यांच्या वीरपत्नी श्रीमती सरला जाधव,विकास जगताप,भाऊसाहेब निंबाळकर, सुभाष खिल्लारे,शिवाजी निकम,सुखदेव काळे,विकास मुळेकर,नितीन कुहिले,दत्तात्रय पगार,अनंत डिके आदी मान्यवर उपस्थित होते.

त्यावेळी पुढे बोलतांना ते म्हणाले की,”थंडी,ऊन,वादळवारा,पाऊस,असो,याची तमा न बाळगता जीवावर उदार होऊन आपल्या कुटुंबाचा विचार न करता देशाच्या सीमेवर भारतीय सैनिक डोळ्यात तेल घालून आपल्या देशाचे संरक्षण करतात.त्यामुळे आपण सर्व सण-उत्सव आपल्या कुटुंबासमवेत साजरे करून सुखाने झोपू शकतो.सैनिकांप्रती असलेल्या आदर भावनेतून सैनिक भवनसाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू व जागा उपलब्ध झाल्यानंतर सैनिक भवनसाठी निधी देखील मिळवून देणार असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close