जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात उपद्रवी राजकारण्यांचे चटके जनतेला बसणार-इशारा

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरात किळसवाण्या राजकारणाचे नवनवीन निचांक स्थापन होत असून त्याचा शहरातील कर भरणाऱ्या जनतेला विनाकारण त्रास सहन करावा लागत असून शहरातील दहशतीने अनेक अधिकारी रजा टाकून पळ काढत असल्याने शहराचे मोठे नुकसान होत असल्याने प्रतिपादन कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी नुकतेच एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

“कोपरगाव नगरपरिषदेत झालेल्या तोडफोड व मारहाण प्रकरणामुळे अनेक अधिकारी रजेवर जात आहेत,तर काहींनी दहशतीमुळे बदलीचे प्रयत्न सुरू केले आहेत.कोपरगाव नगरपरिषदेचे कामकाज ठप्प करण्याचा कुटिल डावपेच करणारे राजकारणी कोण ? हे जनतेला माहित आहे.काहींनी मंजूर विकासकामे होऊ नयेत यासाठी कोर्ट कचेऱ्या करायच्या व काहींनी दहशत करण्याचे षडयंत्र वापरून किळसवाणे राजकारण सुरु केले आहे”-विजय वहाडणे,नगराध्यक्ष कोपरगाव नगरपरिषद.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव नगरपरिषदेने आयुक्त व जिल्हाधिकारी यांचे आदेशाने मार्च २०१० मध्ये शहरातील सुमारे २ हजाराहून अधिक अवैध व्यावसायिकांची अतिक्रमणे हटवली होती.त्यानंतर गत दहा वर्षाहून अधिक काळ या प्रश्नावर विविध पक्षांचे शहरातील मतपेटीचे राजकारण सुरु आहे.ते अद्याप संपण्याची चिन्हे नाही.वर्तमानात अशाच घटना घडत असून अधिकाऱ्यांनी पोलीस बल घेऊन अतिक्रमण काढल्याचा राग मनात धरून अतिक्रमण काढणाऱ्या अधिकाऱ्यांनाच लक्ष केले आहे.ही घटना दि.२२ जुलै २०२१ रोजी घडली असून कोपरगाव नगरपरिषदेने पूनम चित्रपट गृहासमोरील अतिक्रमण काढलेले असताना त्याच ठिकाणी वरील काही आरोपीनी पुन्हा त्याच ठिकाणी आपले दुकान मांडण्याचा प्रयत्न केला असता.त्याला नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे व त्यांच्या सहकाऱ्यांनी हरकत घेतली व त्या विरोधात कारवाई करून ते अतिक्रमण रात्रीच्या सुमारास मुख्याधिकारी डोईफोडे यांच्या आदेशाने काढून टाकले होते.त्याचा राग मनात धरून नगरपरिषद व शिवनेनेच्या काही आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी त्यांनाच लक्ष करून त्यांच्यावर हल्ला चढवला होता.उपमुख्याधिकारी व शहर बांधकाम अभियंता दिगंबर वाघ यांच्या दालनात जाऊन शिवीगाळ तर काहींना मारहाण केली तर तेथील किंमती साहित्याची मोठ्या प्रमाणावर मोडतोड केली होती.त्यामुळे शहरातील वातावरण गढूळ बनलेले आहे.या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी हे प्रासिद्धी पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.

त्यात त्यांनी पुढे म्हटले आहे की,”कोपरगाव नगरपरिषदेत झालेल्या तोडफोड व मारहाण प्रकरणामुळे अनेक अधिकारी रजेवर जात आहेत,तर काहींनी दहशतीमुळे बदलीचे प्रयत्न सुरू केले आहेत.कोपरगाव नगरपरिषदेचे कामकाज ठप्प करण्याचा कुटिल डावपेच करणारे राजकारणी कोण ? हे जनतेला माहित आहे.काहींनी मंजूर विकासकामे होऊ नयेत यासाठी कोर्ट कचेऱ्या करायच्या व काहींनी दहशत करण्याचे षडयंत्र वापरून किळसवाणे राजकारण सुरु केले आहे.ते करणारे कोण आहे हे उघड सत्य जनतेला माहित आहे.माझ्या तोंडून वदवून घेण्याची गरज नाही.
काही अधिकारी व कर्मचारी हजर नसल्याने जनतेला भविष्यात साध्या कामांसाठीही हेलपाटे मारावे लागू शकतात असा कयास व्यक्त केला आहे.सामान्य जनतेपेक्षा काही नेत्यांना स्वतःचे पुढारपण महत्वाचे वाटत असल्याचा आरोप करून पडद्याआड राहून कुटिल राजकारण करणाऱ्या नेत्यांनी आपल्याला जनतेने नाकारले म्हणून जनतेचा अशा पद्धतीने बेत पहाणे योग्य नाही.त्याची त्यांना आगामी काळात किंमत मोजावी लागू शकते असा इशारा नगराध्यक्ष वहाडणे यांनी शेवटी दिला आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close