जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

समता इंटरनॅशनल स्कुलच्या मैदानावर गाजणार राष्ट्रीय पातळीवरील एरोबिक्स स्पर्धा

जाहिरात-9423439946

संपादक -नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी )

कोपरगाव तालुक्यातील कोकम ठाण येथील समता इंटरनॅशनल स्कुल मध्ये ‘एरोबिक्स’ हा क्रीडा प्रकार शिकविला जात असून समता इंटरनॅशनल स्कुलच्या विद्यार्थ्यांनी या क्षेत्रात लक्षवेधी कामगिरी केली असल्याने त्यांना सी.बी.एस.ई.पुरस्कृत राष्ट्रीय पातळीवरील एरोबिक्स स्पर्धांचे आयोजन नोव्हेंबर महिन्यात करण्याचा मान मिळाला असल्याची माहिती प्राचार्यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

समता इंटरनॅशनल स्कुलने अल्पावधित शैक्षणिक क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. विद्यार्थ्यांना देशी-विदेशी सहली, संस्कृती, शिक्षणाचे धडे दिले जात आहे. विदेशातील शाळा, शिक्षण पद्धतीची ओळख करून दिली जात आहे. विद्यार्थ्यांना खेळामध्ये रस निर्माण करून उत्कृष्ट खेळाडू घडविण्यासाठी समता इंटरनॅशनल स्कुल मध्ये महत्वाच्या खेळांचे पशिक्षण दिले जाते. त्यासाठी त्या-त्या खेळांचे प्रशिक्षक उपलब्ध आहे.
‘एरोबिक्स’ विदेशी क्रीडा प्रकार असून. मुळचा रशियाचा असलेला हा क्रीडा प्रकार आता सर्वत्र खेळला जातो. एरोबिक्स ट्रेनिंग दरम्यान श्वासोच्छवासाची गती वाढते त्यात सातत्य ठेवून खेळाडूंना प्रदर्शन करावयाचे असते. एरोबिक्सचा अर्थच ‘ऑक्सिजनच्या सान्निध्यातील आहे.
विशेषतः एरोबिक्सचे दोन प्रकार पडतात स्पोर्ट्स एरोबिक्स, फिटनेस एरोबिक्स या पैकी स्पोर्ट्स एरोबिक्स हा वैयक्तित प्रकार असून फिटनेस एरोबिक्स हा सांघिक प्रकार आहे. यामध्ये सहा ते आठ खेळाडू असतात त्यात त्यांची संघता, ताकद, ताल धरणे अतिशय महत्वाचे असते. हा खेळ संगिताच्या तालावर सदर होतो. एरोबिक्स मध्ये ११, १४, व १९ या वयोगटामध्ये विद्यार्थी विभागले जातात. सी.बी.एस.ई. पुरस्कृत २४ खेळांमध्ये या क्रीडा प्रकारचा समावेश होतो. भारतातून जवळपास १०० हून अधिक संघाचा सहभाग निश्चित झाला असून भारताबाहेरील दुबई (यु.ए.ई ) येथील संघाने सहभागासाठी नाव नोंदणी केलेली आहे. दि.१० नोव्हेंबर ते १२ नोव्हेंबर दरम्यान या स्पर्धा समता इंटरनॅशनल स्कूलच्या प्रांगणावर होणार आहे. भारतातून उत्तरेकडील जम्मू काश्मीर,पंजाब, हरियाणा पासून तर अगदी केरळ, तमिळनाडू या राज्यातील संघही या स्पर्धेत सहभागी झाले आहे तसेच ३००० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सी.बी.एस.ई. कडे नाव नोंदणी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close