जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव-राहाता प्रहार संघटनेकडून दिव्यांग महिलेला शिलाई मशीन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री बच्चुकडू यांच्या जन्मदिनानिमित्त प्रहार दिव्यांग क्रांती व प्रहार जनशक्ती पक्ष कोपरगाव आणि राहाता यांनीं परिश्रमातून , कोपरगाव येथील एका दिव्यांग महिलेला शिवण मशीन वितरित केली आहे.या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

प्रहार जनशक्ती पक्ष हा महाराष्ट्रातील राजकीय पक्ष आहे. महाराष्ट्राच्या १४ व्या विधानसभेत या पक्षाचे दोन आमदार आहेत.प्रहार जनशक्ती पक्ष या संघटनेकडून राज्यभर विविध सामाजिक कार्यक्रम राबविण्यात येतात.कोपरगाव येथेही त्यांनी शिलाई मशीन देण्याचा उपक्रम राबविला आहे.

राज्याचे जलसंपदा राज्य मंत्री बच्चू कडू यांचा वाढदिवस प्रहार संघटनेकडून राज्यभर विविध कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.कोपरगाव आणि राहाता प्रहार संघटनेचे पदाधिकारी यांनी एकत्र येऊन संगीता सोनवणे यांना विनामूल्य शिवण मशीनचे लोकार्पण केले आहे.

सदर प्रसंगी प्रहार दिव्यांग क्रांती जिल्हा संघटक परमेश्वर कराळे,कोपरगाव दिव्यांग तालुकाध्यक्ष शरद खिलारी,शहराध्यक्ष प्रवीण भुजाडे,राजेंद्र वाकचौरे , विनोद राक्षे,दिनेश कांबळे,गिरीश नारंग,विरेन बोरावके, मनसे तालुकाध्यक्ष अनिल गायकवाड व किशोर डोखे,श्री डुकरे, प्रहार जनशक्ती पक्षाचे कोपरगाव तालुकाध्यक्ष संदीप क्षीरसागर,राहाता तालुकाध्यक्ष दिनेश शेळके,कोपरगाव शहराध्यक्ष दिपक पठारे,संदिप लोहकरे,कलिम शेख,राहाता तालुका उपाध्यक्ष विजय काकडे,संघटक वसंत काळे,समनवयक जगन्नाथ सरोदे,निमगाव शहर अध्यक्ष सचिन आरणे आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close