दळणवळण
कोपरगाव तालुक्यातील…या रस्त्याची लागली वाट,ग्रामस्थांनी खड्ड्यात केली वृक्ष लागवड !
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
नगर-नाशिक जिल्ह्यातील साई भक्तांना व साई दिंड्यांना सर्वात जवळचा ठरणारा जवळके मार्गे शिर्डी विमानतळ ते ओझर विमानतळ या मार्गाचे काम होऊन दोन अडीच वर्षही उलटले नाही तोच या मार्गाची वाट लागली असून या कामाची तक्रार करूनही अधिकाऱ्यानी दखल न घेतल्याने आता या रस्त्यात ग्रामस्थांनी ‘वृक्ष लागवड करण्याचे आंदोलन’ करून संगमनेर सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधले आहे.
तत्कालीन खा.भाऊसाहेब वाकचौरे यांच्या सहाय्याने जवळके येथील जनमंगल ग्रामीण विकास संस्थेने थेट दिल्लीत पाठपुरावा करून या मार्ग शिर्डी विमानतळ ते ओझर विमानतळ अशी ओळख करून मार्गावर १० कोटी रुपयांची मोठी तरतूद करून हा दुहेरी करण्याची मागणी केली होती.त्याला भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी प्रतिसाद दिला होता व त्याच्या निविदा प्रसिद्ध करून त्याचे काम नाशिक येथील में.पेखळे या ठेकेदार कंपनीने घेतले होते.या निकृष्ठ कामाची जबाबदारी निश्चित होणे गरजेचे बनले आहे.
शिर्डी येथील साईबाबा समाधीचे दर्शन घेण्यासाठी मुंबई,गुजरात,ठाणे,कल्याण,पनवेल आदी ठिकाणाहून साईभक्त मोठ्या प्रमाणावर शिर्डीत दिंड्यानी व पायी येतात त्यांच्यासाठी हा वावी वरून शिर्डीला जाण्यासाठी सर्वात जवळचा मार्ग म्हणून जवळके मार्गे शिर्डी या पालखी मार्गाची ओळख आहे.या जिल्हा मार्ग म्हणून याची ओळख होती मात्र जवळके येथील जनमंगल ग्रामीण विकास संस्थेने या मार्गाकडे पहिल्यांदा लक्ष वेधून घेतले व साई बाबांच्या शिर्डीला जाण्यासाठी व नगर-मनमाड मार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी हा मार्ग सर्वात व स्वस्त पर्याय म्हणून याकडे लक्ष वेधून घेतले होते.व राज्यात १९९५ साली शिवसेना-भाजप युतीचे राज्य असताना सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री अशोक डोणगावकर यांचे लक्ष वेधून घेतले होते.त्यांनी त्याला प्रतिसाद देऊन हा मार्ग नगर जिल्हा परिषदेकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केला होता.तो पासून या मार्गावर आर्थिक तरतूद होऊन हा मार्ग वाहतूक योग्य झाला आहे.त्या नंतर सन २०१४ साली दिल्लीत भाजपचे सरकार स्थानापन्न झाल्यावर २०१५ साली तत्कालीन खा.भाऊसाहेब वाकचौरे यांच्या सहाय्याने जनमंगल ग्रामीण विकास संस्थेने थेट दिल्लीत पाठपुरावा करून या मार्ग शिर्डी विमानतळ ते ओझर विमानतळ अशी ओळख करून मार्गावर १० कोटी रुपयांची मोठी तरतूद करून हा दुहेरी करण्याची मागणी केली होती.त्याला भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दहा कोटी रुपयांची तरतूद करून दिली होती.व त्याच्या निविदा प्रसिद्ध करून त्याचे काम नाशिक येथील में.पेखळे या ठेकेदार कंपनीने घेतले होते.मात्र या कंपनीने हे काम एका नाशिक स्थित खासदारांच्या हट्टापायी काही सेनेच्या कार्यकर्त्याना हे काम उपठेकेदार म्हणून दिले होते.त्यांनी या मार्गाचे काम निकृष्ठ सुरु केले होते.त्यावेळी जवळके येथील जनमंगल संस्थेच्या कार्यकर्त्यांनी याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग संगमनेर व कोपरगाव येथील उपविभाग यांचेकडे लेखी तक्रारी केल्या होत्या व हे काम तातडीने बंद करण्याची मागणी केली होती.व बहादरपूर येथे या कंपनीचे काम बंदही केले होते.तर काही महिन्यांपूर्वी अड्.योगेश खालकर यांनी आंदोलन करून या मार्गाकडे लक्ष वेधले होते.मात्र वारंवार पाठपुरावा करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तत्कालीन अधिकाऱ्यांनी याकडे आपल्या आर्थिक लोभापायी दुर्लक्ष केले व रस्त्याची वाट लावली आहे.त्यामुळे आता या संबंधित ठेकेदाराची चौकशी करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
या रस्त्यावरील खड्ड्यांकडे लक्षवेधण्यासाठी ग्रामस्थांनी पडलेल्या खड्यात वृक्ष लागवड करून निषेध नोंदवला आहे.व या मार्गाची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी जनमंगल ग्रामविकास संस्थेचे अध्यक्ष उत्तम थोरात, बहादरपूर येथील माजी सरपंच वसंत थोरात,बंडोपंत थोरात, कैलास रहाणे,माजी उपसरपंच गंगाधर रहाणे,चंद्रकांत थोरात,गोरक्षनाथ शिंदे,दगडू पा.रहाणे,जवळके ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय थोरात,प्रकाश थोरात,डी.के.थोरात,वाल्मिक नेहे,विश्वनाथ शिंदे,अण्णासाहेब शिंदे,खंडू थोरात,महेश थोरात,सुधीर थोरात,विवेक थोरात,प्रसाद दरेकर,अण्णासाहेब रहाणे,आदि ग्रामस्थांनी केली आहे.