कोपरगाव तालुका
राष्ट्रवादीला विकासकामांचे श्रेय मिळू नये यासाठी कोल्हे गटाची निष्फळ धडपड-आ.काळे
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील दळणवळणात महत्वाची भूमिका निभावणाऱ्या २८रस्त्यांची कामे झाली तर आपली राजकीय पंचायत होईल या पेचातुन कोल्हेगट विकास कामांना विरोध करत असल्याचे प्रतिपादन कोपरगावचे आ आशुतोष काळे यांनी कोपरगाव येथे आयोजित कार्यक्रमात केले आहे.
सदर प्रसंगी आ.आशुतोष काळे यांनी आपल्या भाषणात,”माजी नगरसेवक रमेश गवळी यांनी काहीं कामांची पत्रके त्यांच्या प्रभागात वाटली “त्या”कामास आपण सामाजिक संकेतस्थळावर आवड (लाईक) कळवली त्यांनी त्यातून गैरसमज करुन त्यांनी आपली आगामी नगरपरिषद निवडणुकीत उमेदवारी निश्चित समजू नये अशी कोपरखीळी हाणल्यावर ऊपस्थितांत हशा पिकला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा भारताच्या एक राष्ट्रीय पक्ष असून मुख्यत्वे महाराष्ट्रात प्रभावशाली आहे. शरद पवार यांनी इ.स. १९९९ मध्ये या पक्षाची स्थापना केली, त्यानंतर हा पक्ष भारतीय काँग्रेस पक्षाच्या साथीने इ.स. १९९९ ते २०१४ या कालावधीत महाराष्ट्र राज्यात सत्तेवर राहिला. हा पक्ष २००४ ते २०१४ च्या दरम्यान काँग्रेस प्रणीत संपुआ मध्ये राहून केंद्रीय सरकारमध्येही सहभागी झाला होता.आगामी काळात राज्यातील नगरपरिषदेच्या निवडणुका काही महिन्यावर आल्या असून या पार्श्वभूमीवर पक्षाने संघटन वाढविण्यास प्रारंभ केला आहे.त्याचाच एक भाग म्हणून कोपरगाव शहरातील पदाधिकाऱ्यांचे पद वितरण कार्यक्रम आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
सदर प्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगूले,कोपरगाव नगरपरिषदेचे गटनेते विरेंन बोरावके,नगरसेवक मेहमूद सय्यद,मंदार पहाडे,राजेंद्र वाकचौरे,संदीप पगारे,डॉ.अनिरुद्ध काळे,फकीर कुरेशी राजेंद्र फुलफगर,ओ. बी.सी.सेलचे कार्याध्यक्ष रमेश गवळी,विजय बोरा,आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की,आपली समृद्धी महामार्गाबाबत विरोध असल्याची आवई उठवून आपली बदनामी केली.आपण विकास कामासोबत आहेत हे अनेक पुराव्यानिशी सिद्ध झाले आहे.विरोधकांचे शहरात नगरसेवक कमी असताना शहरातील नागरीकानी मोठे मताधिक्य देऊन आपल्याला निवडून दिले तसे आगामी काळात नगरपरिषद निवडणुकीत पूर्ण बहुमताने निवडून द्यावे असे म्हणून आगामी नगरपरिषद निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे.आपल्याला शहर विकासासाठी सत्ता हवी आहे.भाजप सारखे विकासाला आपले नाक कापून आडवे जायचे नाही.काळ कोरोनाचा असून नागरिकांना सहाय्य करा लसीकरण करण्यास मदत करा तेच आपल्या कामाची दखल घेतली २८ कामांना भाजपने विरोध केला असला तरी आगामी काळात जनता निवडणुकीत त्यांना मतपेटीतून उत्तर देतील असा आशावाद शेवटी व्यक्त केला आहे.
सदर प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्तविक अशोक आव्हाटे यांनी केले तर उपस्थितांना मार्गदर्शन शहराध्यक्ष सुनील गंगूले,बाळासाहेब रुईकर,नगरसेवक मेहमूद सय्यद,यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.तर सूत्र संचलन रमेश गवळी यांनी केले तर उपस्थितांचे आभार युवक शहर कार्याध्यक्ष नवाज कुरेशी यांनी मानले आहे.
त्यावेळी उपस्थित नूतन पदाधिकाऱ्यांना आ.काळे यांच्या हस्ते पदवितरण पत्रकांचे वितरण करण्यात आले त्यावेळी बहुसंख्येने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
सदर प्रसंगी सुनील गंगूले बोलतांना म्हणाले की,ज्यांनी कोपरगाव शहराला लुटून खाल्ले त्यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीवर सात लाख रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला तो त्यांनी सिद्ध करावा उगीच साप-साप म्हणून भुई बडवू नये.सत्ताधाऱ्यांनी बळाचा वापर केला तर त्याला जशास तसे उत्तर दिले जाईल.हातगाडी,टपरी धारकांकडून हप्ते गोळा करणारांचा जशास तसे उत्तर दिले जाईल.