जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

राष्ट्रवादीचे उमेदवार काळे यांच्या प्रचारार्थ मोटरसायकल फेरीला प्रतिसाद

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी )

कोपरगाव विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेस, राष्ट्रीय कॉंग्रेस व मित्रपक्ष आघाडीचे उमेदवार आशुतोष काळे यांच्या प्रचारार्थ साईबाबा चौकातून भव्य मोटरसायकल फेरीचे आयोजन करण्यात आले होते. या मोटरसायकल फेरीला कोपरगाव शहराच्या नागरिकांचा लक्षवेधी प्रतिसाद मिळाला आहे. कोपरगाव शहरातील सर्व रस्ते या मोटरसायकल फेरीने फुलून गेले होते.
कोपरगाव शहरातील नगर-मनमाड रस्त्यावरील साईबाबा चौक येथून श्री. साईबाबा यांचे दर्शन घेऊन सकाळी मोटरसायकल फेरीला सुरुवात झाली. या मोटरसायकल फेरीमध्ये हजारोंच्या संख्येने सहभागी झालेले तरुण नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते. साईबाबा तपोभूमी येथून दर्शन घेऊन, आण्णाभाऊ साठे स्मारक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, राष्ट्रपिता महात्मा गांधी चौक, शिवाजी रोड, सराफ बाजार, पांडे गल्ली, जब्रेश्वर मंदिर, सावरकर चौक, गांधीनगर रोड, आचारी हॉस्पिटल चौक, संभाजी चौक गोकुळनगरी, टाकळी नका , गोदावरी खोरे पेट्रोल पंप, येवला नाका चौफुली ते साईबाबा तपोभूमी साईबाबा चौक कोपरगाव या मार्गावर मोटरसायकल हि फेरी काढण्यात आली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close