जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

चाळीस वर्ष सत्ता देवूनही जनतेला करंटे म्हणण्याचे धाडस होतेच कसे – आशुतोष काळेचा सवाल

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी )
कोपरगाव विधानसभा मतदार संघातील भोळ्या भाबड्या जनतेने तब्बल चाळीस वर्षे कोल्हे परिवाराला सत्ता दिली. विकासाची दूरदृष्टी नसल्यामुळे विकास झाला नाही. हे कोल्हे परिवाराचे अपयश आहे. हे अपयश त्यांनी मान्य करून कोपरगाव मतदार संघातील तमाम जनतेची माफी मागायला पाहिजे. मात्र तालुक्याच्या आमदार माफी मागायचे दूरच मात्र कोपरगावच्या जनतेला करंटे म्हणतात हा कोपरगावच्या जनतेचा अपमान असून कोपरगावच्या जनतेला करंटे म्हणण्याचे त्यांना धाडस होतेच कसे असा खडा सवाल तालुक्याच्या आमदार स्नेहलता कोल्हे यांचे नाव न घेता राष्ट्रवादी कॉंग्रेस, राष्ट्रीय कॉंग्रेस व मित्रपक्ष आघाडीचे उमेदवार आशुतोष काळे यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदान पुणतांबा या ठिकाणी झालेल्या जाहीर सभेत उपस्थित केला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या सुरुवातीपासून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात भाजप शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा ओघ या सभेतही सुरूच होता यावेळी आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत वाकडीचे शिवसेना उपाध्यक्ष भाऊसाहेब कहाटे, दादासाहेब गोरे मित्रमंडळाचे कार्यकर्ते तसेच प्रसाद गोरे, शिवा गोरे, सोमनाथ गोरे, चितळी तंटामुक्ती अध्यक्ष शैलेश वाघ यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते

कोपरगाव वकील संघात आपला प्रचार करण्यासाठी आ. स्नेहलता कोल्हे या गेल्या असता त्यांनी कोपरगावतील जनतेला करंटे संबोधले होते त्याची बातमी जनशक्ती न्यूजला प्रसिद्ध झाली होती त्याचे तीव्र पडसाद मतदारसंघात उमटले असून आशुतोष काळे यांच्या प्रचारार्थ पुणतांबा जाहीर सभा आयोजित करण्यात आली यावेळी ते बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी डॉ.संभाजीराव सोनवणे होते.

यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस चे राहाता तालुकाध्यक्ष सुधीर म्हस्के, अँड.मुरलीधर थोरात, दिलीप चौधरी, बाबासाहेब चव्हाण, निळवंडे पाटपाणी कृती समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर वर्पे, कार्याध्यक्ष गंगाधर गमे, अनिल कोते, सुरेश लहारे, मुरलीधर शेळके, गौतम बँकेचे अध्यक्ष बाबासाहेब कोते, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव शेळके, नंदकुमार सदाफळ, प्रतापराव लहारे, नपावाडीचे उपसरपंच राजेंद्र धनवटे, दीपक वाघ, भास्करराव चौधरी, अक्षय काळे आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलतांना ते म्हणाले की, माजी आ. अशोक काळे यांनी त्यांच्या कार्यकाळात मतदार संघातील सर्व गावांना समान न्याय दिला. जेवढा निधी कोपरगाव तालुक्याला त्या प्रमाणात कोपरगाव विधानसभा मतदार संघाला जोडलेल्या राहाता तालुक्यातील ११ गावांना दिला तसेच धार्मिक स्थळांसाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला. मात्र मागील ५ वर्षात कोपरगाव मतदार संघाचा विकास झाला नाही हे वास्तव असून जनता त्रस्त झालेली असल्याचे सांगितले.

दोन दिवसांपासून प्रसिद्धी माध्यमांमध्ये तालुक्याच्या आ. कोल्हे यांनी एका कार्यक्रमामध्ये कोपरगावच्या जनतेला करंटे म्हणाले असल्याची बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली असून कोल्हेच्या या वक्तव्याचा आशुतोष काळे यांनी यावेळी चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले की मतदार आता सुज्ञ झाला असून थापा मारायचे दिवस आता संपले आहे. त्यामुळे आजपर्यंत झालेल्या निवडणुकीत थापा देवून निवडून आलेल्यांना मतदार दारात उभे करीत नसल्यामुळे पराभव स्पष्ट दिसू लागला आहे. त्यामुळे त्यांचा आता तोल सुटू लागला असून त्यामुळे अशा प्रकारचे वक्तव्य करीत आहे मात्र त्यांना कोपरगावच्या जनतेचा अपमान करण्याचा कोणताच अधिकार नाही.

तालुक्याच्या शेजारील तालुक्यांमध्ये जो विकास झाला तो कोपरगावात का झाला नाही. माजी आ.अशोक काळे यांनी विरोधी पक्षाचे आमदार असतांना जो विकास केला तो राज्यात व देशात त्यांच्या पक्षाचे सरकार असून झाला नाही याचा विचार देखील केला पाहिजे. फक्त गुळगुळीत पुस्तक छापून व मंत्र्यासोबत फोटो काढून कधीच विकास होत नसतो. त्यासाठी विकास करण्याची मानसिकता असावी लागते ती मानसिकताच त्यांच्याकडे नसल्यामुळे मागील पाच वर्षात कोपरगाव विधानसभा मतदार संघाच्या विकासाचा खेळखंडोबा झाला आहे.

शेतकऱ्यांचा संप मोडून तसेच पुणतांबा गावातील कृषी कन्यांनी केलेले आमरण उपोषणाचे आंदोलन मोडीत काढून त्यांच्या पालकांवर गुन्हे दाखल करून त्यांना तुरुंगात बसविण्याचे काम आमदार कोल्हे यांनी केले असल्याचा आरोप आशुतोष काळे यांनी केला. विकासकामे करण्यात तुम्ही अपयशी ठरला आहात हे मान्य करा मात्र जनता तुम्हाला ज्यावेळी विकास का झाला असा प्रश्न विचारेल त्यावेळी एकवेळ त्या प्रश्नाला उत्तर देवू नका मात्र कोपरगावच्या जनतेचा अपमान मात्र करू नका असा सल्ला त्यांनी यावेळी आ. कोल्हे यांना दिला. यावेळी दिनेश जगताप, विठ्ठलराव शेळके, आण्णासाहेब कोते, गंगाधर गमे, संजय धनवटे, अशोक काळे, मुरलीधर थोरात, दत्तात्रय वाबळे, सुधीर म्हस्के यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

शेतकऱ्यांचा संप मोडून तसेच पुणतांबा गावातील कृषी कन्यांनी केलेले आमरण उपोषणाचे आंदोलन मोडीत काढून त्यांच्या पालकांवर गुन्हे दाखल करून त्यांना तुरुंगात बसविण्याचे काम आमदार कोल्हे यांनी केले असल्याचा आरोप आशुतोष काळे यांनी केला. विकासकामे करण्यात तुम्ही अपयशी ठरला आहात हे मान्य करा मात्र जनता तुम्हाला ज्यावेळी विकास का झाला असा प्रश्न विचारेल त्यावेळी एकवेळ त्या प्रश्नाला उत्तर देवू नका मात्र कोपरगावच्या जनतेचा अपमान मात्र करू नका असा सल्ला त्यांनी यावेळी आ. कोल्हे यांना दिला. यावेळी दिनेश जगताप, विठ्ठलराव शेळके, आण्णासाहेब कोते, गंगाधर गमे, संजय धनवटे, अशोक काळे, मुरलीधर थोरात, दत्तात्रय वाबळे, सुधीर म्हस्के यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close