खेळजगत
आत्मा मालिक इंटरनॅशनल स्कुलच्या विद्यार्थी ची नेत्रदीप कामगिरी
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी )
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीसीई ) व आत्मा मालिक शैक्षणिक व क्रिडा संकुल यांच्या संयुक्त विद्यमाने ९ व्या सीबीसीई क्लस्टर व्हॉलीबॉल स्पर्धा आत्मा मालिक इंटरनॅशनल स्कुल च्या मैदानात आयोजित करण्यात आल्या होत्या या मध्ये संपूर्ण महाराष्ट्रातुन वय १७ ते १९ वर्षा वयोगटातील मुलांचे ३२ संघ तर मुलींचे २० संघानी सहभाग नोंदवला होता.यात सीबीसीई चा संघ विजय होऊन प्रथम क्रमांक पटकावला आहे तर मुलींनी दुसरा क्रमांक पटकावला आहे व आता हे संघ महाराष्ट्र राज्य चे प्रतिनिधित्व करणार आहेत ते राज्यस्तरीय होणाऱ्या मध्यप्रदेशातील सेंधवा या शहरात हा संघ महाराष्ट्राचे नाव गाजवणार आहे.
गुणवत्तापूर्ण उत्कृष्ट क्रिडा व शिक्षण यासह अध्यात्मिकतेचा पाया असलेल्या आत्मा मालिक इंटरनॅशनल स्कुल अर्थात सी.बी.एस. ई. च्या विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात परंपरा कायम राखत लक्षवेधी यश संपादन केले आहे
या सर्व खेळाडूंचे आत्मा मालिक माऊली, परमानंद महाराज व समस्त संत मांदियाळी ने विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे. संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी, कोषाध्यक्ष विठठल होन,सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे,अध्यक्ष कांतीलाल पटेल ,मुख्याध्यापक नामदेव डांगे,वंदना थोरात ,व्यवस्थापक सुरेश शिंदे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.