जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

प्रसिद्धीचा सोस कोणाला जे शहरातील जनतेला ज्ञात-नगराध्यक्ष

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव नगरपरिषदेची निवडणुक होण्यापूर्वी कुठलाही कार्यादेश नसतांना कोल्हे पती-पत्नींनी घाईघाईने वाचनालय इमारत,नगरपरिषद कार्यालय व जिजामाता उद्यान या तीनही कामांचे भूमिपूजन व कोनशीला लावण्याचे काम केले.पुन्हा सत्ता मिळण्याची शक्यता नसल्याने तुम्ही दि.१६ सप्टेंबर २०१६ रोजी रोजी सदरच्या कोनशीला लावून घेतल्या.त्या कोनशीला बनविण्याचे काम करणाऱ्यास अजूनही बिल दिले गेले नाही.प्रत्येक उद्घाटनाच्या अगोदर पतीदेवाचा व पूर्ण नावाचा उल्लेख यातून प्रसिद्धीचा सोस कोणाला आहे हे सांगण्यासाठी कोणा ज्योतिषाची गरज नसल्याचे प्रतिपादन कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी नुकतेच केल्याने कोल्हे गटाला चोख उत्तर दिल्याचे समजले जात आहे.

“आपण तर आजपर्यंत एकदाही माझ्या छायाचित्रांचा फलक लावू दिलेला नाही,एकदा तर लावलेला फलक एकदा काढायला भाग पाडले आहे.आजपर्यंत बहुसंख्य वेळा ध्वजारोहण करण्याची,भूमिपूजन-उदघाटन करण्याची दुसऱ्यांनाच संधी दिलीआहे.तर दुसरीकडे कोल्हे यांनी तर कोरोनारुग्णांना “पुरण पोळ्या” वाटतानाचेही फोटो काढून किळसवाणी प्रसिद्धी मिळवली.विशेष म्हणजे त्या पुरण पोळ्याही संजीवनीच्याच खर्चाच्या होत्या हे विशेष ! हा पुरावा प्रसिद्धीची हौस होणाला हे सांगण्यास पुरेशी ठरावी”-विजय वहाडणे नगराध्यक्ष कोपरगाव नगरपरिषद.

कोपरगाव नगरपरिषदेच्या शहरांतर्गत विविध २९ रस्त्याला कोल्हे गटाने आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व रस्त्यांची कामे बहुमताच्या जोरावर फेटाळली होती.त्यावर नगराध्यक्ष विजय वहाडणे व आ.काळे गट हे जिल्हाधिकाऱ्यांकडे अपिलात गेले होते.त्या नंतर तो निकाल कोल्हेगटाच्या विरोधात जाऊन शहर हिताच्या दृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांनी पालिकेच्या बाजूने निकाल दिल्यावर या रस्त्यातील काटे दूर झाले असताना व त्याचे उदघाटन नुकतेच आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते व नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्या प्रमुख उपस्थित नुकतेच संपन्न झाले. त्या वेळी त्यांनी कोल्हे गटाच्या नगरसेवकांना निमंत्रण देऊनही त्यांनी या कार्यक्रमापासून दूर राहणे पसंत केल्याने पुन्हा एकदा या वादाला तोंड फुटले आहे.वहाडणे यांनी या उद्घाटनाला कोल्हे गटाच्या अनुपस्थितीवर प्रश्न उपस्थित करून जाब विचारला असताना त्याला उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे यांनी या दोघांच्या विरोधात गरळ ओकणे सुरु केल्याने त्याला नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये उत्तर दिले आहे.

त्यांनी आपल्या पत्रकात पुढे म्हटले आहे की,”वर्तमानात होत असलेल्या विकास कामांचे भूमिपूजनावर,” नगराध्यक्ष व आमदारांना प्रसिद्धीची हौस आहे” असे हास्यास्पद आरोप करायचे हे आक्रीतच म्हटले पाहिजे.आपण तर आजपर्यंत एकदाही माझ्या छायाचित्रांचा फलक लावू दिलेला नाही,एकदा तर लावलेला फलक एकदा काढायला भाग पाडले आहे.आजपर्यंत बहुसंख्य वेळा ध्वजारोहण करण्याची,भूमिपूजन-उदघाटन करण्याची दुसऱ्यांनाच संधी दिलीआहे.तर दुसरीकडे कोल्हे यांनी तर कोरोनारुग्णांना “पुरण पोळ्या” वाटतानाचेही फोटो काढून किळसवाणी प्रसिद्धी मिळवली.विशेष म्हणजे त्या पुरण पोळ्याही संजीवनीच्याच खर्चाच्या हे विशेष ! हे करताना (सर्वत्र सामाजिक संकेतस्थळावर टीकेची झोड उठल्यावर) तुम्ही सुरू केलेल्या कोविड सेंटरबद्दल अभिनंदन.खरे तर कोल्हे यांनी नगरसेवकांचा वापर करून कशा प्रकारचे डावपेच नगरपरिषदेत केले हे जनतेला साडेचार वर्षात चांगलेच अनुभवास आले आहे.या बाबत आपण त्या बिचाऱ्या नगरसेवकांना दोष देणार नाही.(कारण येणाऱ्या नगरपरिषद निवडणुकीत उमेदवारी मिळविण्यासाठी संजीवनीचा आदेश पाळणे हि त्यांची राजकीय मजबुरी आहे) केवळ काही नगरसेवकच नव्हे तर अजून चार-पाच भाटही याच कामासाठी पोसलेले आहेत.महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथीच्या फलकावरही पतिपत्नीचे फोटो का असतात ? फ्लेक्सचा खर्चही शेतकरी सभासदांच्या संजीवनीतूनच भागविला जातो ना ? प्रत्येक उदघाटनांचा फलकावर पतीराजाचा आधी फोटो का असतो ? तुम्हीच मला बोलायला भाग पाडता.कोरोनाच्या संकटात आपणाला टिका टिप्पणी करायची नाही असेच ठरविले होते.पण तुम्ही शांत रहाणार नसल्याने नाईलाजाने मला प्रतिक्रिया द्यावीच लागत असल्याचे नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी शेवटी म्हटले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close