जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगाव तालुक्यात बनावट नवरी बनावट लग्न,नऊ पैकी चार आरोपी अटक,

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी ग्रामपंचायत हद्दीतील रहिवाशी नवरा दीपक भीमराज कोळपे (वय-२७) याची बनावट नवरी उभी करून बनावट लग्न लावून त्याच्याकडून ०१ लाख ०५ हजारांची फसवणूक केल्या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी मालेगाव येथील आरोपी गणपत पवार (पूर्ण नाव माहिती नाही) संगीता जगताप,चित्रा कैलास अंभोरे,रा.मनमाड,जयश्री शैलेश जाधव (नवरी) रा.औरंगाबाद,गीता कॊसरे,पूनम पवार,वर्षाबाई निकम सर्व रा.नाशिक,भाऊसाहेब दोडके (एजंट) रा.ब्राम्हणगाव,यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून काल यातील चौघांना अटक केली असून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.या घटनेने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

मुलगा-मुलगी भेदातून समाजात मुलींची संख्या कमी आहे.त्यात मुली शिकलेल्या असल्याने त्यांच्या व पालकांच्याही वराकडून मोठ्या अपेक्षा असल्याने अनेक कुटुंबांकडून अनाथाश्रमात वाढलेल्या मुलींना विवाहासाठी प्राधान्य दिले जात आहे.ज्यांना आता मुली मिळण्यास अडचण निर्माण झाली असे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालल्याने आता याबाबत विवाहोच्छुक मुलींसाठी एजंट तयार झाले असून ते इच्छुक वरांची फसवणूक करतानाच्या घटना अधून मधून उघड होत आहे.अशीच धक्कादायक घटना नुकतीच कोपरगाव तालुक्यात कोळपेवाडी येथे एका मजुरांचा बाबतीत घडली आहे.

जगात सर्वसाधारणपणे पुरूष व स्त्रियांचे प्रमाण १:१ असे अपेक्षित असले तरीही प्रत्येक देशात हे गुणोत्तर वेगळे आढळते.भारतात स्त्रियांची घटणारी लोकसंख्या चिंतेची बाब झाली आहे.२०११ सालच्या जनगणना अहवालानुसार भारतात १००० पुरुषांमागे ९४० स्त्रिया आहेत.म्हणजेच लिंग गुणोत्तर ९४० आहे.त्यामुळे मुलामुलींच्या संख्येतील व्यस्त प्रमाण,वधूसह पालकांच्या वाढलेल्या अपेक्षा यांमुळे सध्या मुलांचे विवाह होणे हीच मोठी समस्या बनली आहे.परिणामी राज्याच्या महिला-बालकल्याण विभागाच्या आकडेवारीनुसार मुलींशी विवाह करण्यासाठी इच्छुक असलेल्या मुलांची संख्या मोठ्या प्रमाणावर व्यस्त बनली आहे.मुलगा-मुलगी भेदातून समाजात मुलींची संख्या कमी आहे.त्यात मुली शिकलेल्या असल्याने त्यांच्या व पालकांच्याही वराकडून मोठ्या अपेक्षा असल्याने अनेक कुटुंबांकडून अनाथाश्रमात वाढलेल्या मुलींना विवाहासाठी प्राधान्य दिले जात आहे.ज्यांना आता मुली मिळण्यास अडचण निर्माण झाली असे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालल्याने आता याबाबत विवाहोच्छुक मुलींसाठी एजंट तयार झाले असून ते इच्छुक वरांची फसवणूक करतानाच्या घटना अधून मधून उघड होत आहे.अशीच घटना नुकतीच कोपरगाव तालुक्यात कोळपेवाडी येथील मजुर दीपक कोळपे याच्या बाबतीत घडली असून त्याला लग्नासाठी मुलगी मिळवून देतो असे आश्वासन देऊन वरील टोळीने त्याला तब्बल १ लाख ०५ हजाराला गंडा घातला असल्याची घटना उघड झाली आहे.

याबाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात या तरुणाने फिर्याद दिली असून त्यात त्याने आरोपी म्हणून आरोपी गणपत पवार (पूर्ण नाव माहिती नाही) संगीता जगताप,(पूर्ण नाव माहिती नाही),चित्रा कैलास अंभोरे,रा.मनमाड,जयश्री शैलेश जाधव (नवरी) रा.औरंगाबाद,गीता कॊसरे,(पूर्ण नाव माहिती नाही) पूनम पवार,(पूर्ण नाव माहिती नाही),वर्षाबाई निकम (पूर्ण नाव माहिती नाही) मुलीची मावशी,सर्व रा.नाशिक,भाऊसाहेब दोडके (एजंट)(गणपत पवारांचा मित्र),भगवान कचरू शिंगाडे रा.ब्राम्हणगाव (एजंट) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून काल यातील आरोपी विविध ठिकाणाहून तालुका पोलिसांनी अटक केली आहे.त्यात आरोपी भगवान शिंगाडे याचा फोन पोलिसांनी तपासाला असता घटना खरी निघाली आहे.त्यामुळे पोलीसांनी या प्रकरणी तातडीने हालचाल करून आरोपी गणपत मारुती पवार रा.लक्ष्मीनगर मालेगाव, याला अटक केली असून दुसरा आरोपी भाऊसाहेब दामू दोडके व भगवान कचरू शिंगाडे या दोघांना ब्राम्हणगाव येथून अटक केली आहे.तर नवरी मुलगी जयश्री शैलेश जाधव (वय-२५) रा.मांजरीं ता.जि. औरंगाबाद हिला काल अटक केली आहे.याच गुंह्यातील महिला आरोपी संगीता भगवान जगताप (वय-४०)रा.एकलहरे ता.जि.नाशिक हिला त्या ठिकाणी पोलीस पथक पाठवून अटक केली आहे.या सर्वांना आज कोपरगाव येथील न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना दोन्ही बाजूंचे म्हणणे एकूण न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

याबाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी तातडीने हालचाल करून आरोपी जेरबंद केल्याने त्यांच्या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.त्यांना तपासी अंमलदार पो.हे.कॉ.श्री गवसने,श्री शेख,श्री.वाघ,अनिस शेख,महिला पोलीस कॉ.उषा मुठे,फिजा पठाण आदींनी सहाय्य केले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close