जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव पालिकेच्या “त्या” नोटिसा आम्हाला मिळाल्याचं नाही-बाळासाहेब आव्हाड

जाहिरात-9423439946

संपादक -नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी )

कोपरगाव शहरातील जुन्या गावठाण हद्दीतील दक्षिणमुखी हनुमान मंदिरासमोरील व गाववेशीच्या शेजारील मुरलीधर मंदिर ट्रस्टची सुमारे पंच्याहत्तर वर्षा पूर्वीची उत्तर मुखी इमारत रात्री साडे दहाच्या सुमारास अंशतः कोसळून मोठा अनर्थ टळला असताना या ट्रस्टशी संबंधित अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांनी आपल्याला नगरपरिषदेच्या अशा कुठल्याही नोटिसा मिळालेल्या नसल्याचा खुलासा केल्याने नागरिकांत नगरपरिषद कारभारा बाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

या बाबत आमच्या प्रतिनिधींशी शुक्राचार्य मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांनी संपर्क साधला व नगरपरिषदेने आपल्याला नोटिसा दिल्या नसल्याचा दावा केल्याने या दाव्या प्रतिदाव्यात नेमके कोण खरे कोण खोटे या बाबत जनतेत संभ्रम निर्माण झाला आहे.या बाबत कोपरगाव नगर परिषदेने खुलासा करणे गरजेचे बनले आहे.मुरलीधर मंदिर ट्रस्ट हे शुक्राचार्य मंदिर ट्रस्टशी संबंधित असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.

कोपरगाव शहरातील जुन्या गावठाण हद्दीतील दक्षिणमुखी हनुमान मंदिरासमोरील मुरलीधर मंदिर ट्रस्टची जुनी पंच्याहत्तर वर्षाची जुनी इमारत नागरिकांचे दैव बलवत्तर म्हणून सदर इमारतीच्या वरच्या व्हरांडीचा भाग बऱ्याच अंशी कोसळला मात्र त्यावेळी सदरचा रस्ता रात्र झाली असल्याने निर्जन झाला होता त्यामुळे या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही.तरी त्या रस्त्यावर त्याच इमारतीच्या आडोशाने उभी केलेली हिरो कंपनीची दुचाकी मात्र या अपघाताला बळी पडली असून दुचाकीस्वार तुषार जाधव यांचे सुमारे पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.दरम्यान त्याच इमारतीत संस्कृतचे जुने जाणते पंडित व जेष्ठ नागरिक गोविंद बळवंत पाठक हे वरच्या मजल्यावर रहात होते त्यानां बाहेर काढण्यासाठी नगरपालिका प्रशासन व पोलीसांना मोठे प्रयत्न करावे लागले त्यांनी इमारतीतून बाहेर पडण्यास नकार दिला होता.दरम्यान कोपरगाव नगरपरिषदेने याची तातडीने दाखल घेऊन सदरचा रस्ता संरक्षक लाकडी जाळ्या लावून वाहतुकीसाठी तात्पुरता बंद केला होता तथापि या बाबत आमच्या प्रतिनिधींशी मुरलीधर मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांनी संपर्क साधला व नगरपरिषदेने आपल्याला नोटिसा दिल्या नसल्याचा दावा केल्याने या दाव्या प्रतिदाव्यात नेमके कोण खरे कोण खोटे या बाबत जनतेत संभ्रम निर्माण झाला आहे.या बाबत कोपरगाव नगर परिषदेने खुलासा करणे गरजेचे बनले आहे.या शिवाय मागील बाजूस जीर्ण झालेल्या दोन इमारती ट्रस्टने या पूर्वीच काढून टाकल्याची माहितीही त्यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close