कोपरगाव तालुका
कोपरगावात आ. कोल्हे याना उमेदवारी जाहीर,काळे,वहाडणे,लबडे यांच्यापुढे पेच !
संपादक -नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी )
कोपरगाव विधानसभा मतदारसंघात आज मंगळवार दि.१ आँक्टोबर रोजी १३ लोकांनी २२ अर्ज नेले आहे.मात्र दाखल मात्र एकानेही केलेला नाही.आत्ता पर्यंत ५२ उमेदवारांनी ८८ उमेदवारी अर्ज नेले असून नामनिर्देशन दाखल करण्यासाठी आता तीन दिवस बाकी राहिले आहेत.दरम्यान कोपरगाव विधानसभा मतदारसंघात सत्ताधारी भाजपकडून विद्यमान आ. स्नेहलता कोल्हे याना पुन्हा एकदा उमेदवारी प्राप्त झाल्याने इच्छुक उमेद्वारांसह मतदाराच्या भुवया उंचावल्या आहेत.यामुळे आता आशुतोष काळे यांना आता राष्ट्रवादी किंवा अपक्ष हे दोन पर्याय शिल्लक दिसत असून विजय वहाडणे व प्रमोद लबडे याना आता अपक्ष हाच एक रस्ता शिल्लक राहिला आहे.त्यामुळे आता ते कोणती भूमिका घेतात याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.
आज उमेदवारी अर्ज भरुन अर्ज निर्धारित वेळेत सकाळी ११:०० ते दुपारी ३:०० वाजेपर्यंत एकही उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही.आज पर्यत दोन उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी राहुल मुंडके, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार योगेश चंद्रे यांनी दिली आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
राज्यातील 288 जागांसाठी 21 ऑक्टोबर रोजी निवडणूक संपन्न होत आहे.या निवडणुकीत सत्ताधारी भाजप व शिवसेनेची युती जाहीर झाली आहे.त्यांची उमेदवारांची पहिली यादी नुकतीच जाहीर झाली आहे.या पहिल्याच यादीत कोपरगावात विद्यमान आ. कोल्हे यांचे विस्मयकारक नाव आले आहे.त्यांनी उमेदवारीची आशा जवळ-जवळ सोडून दिली होती.व सत्ताधारी गटाच्या व्यासपीठावरून पक्षचिन्हही गायब झाल्याचे दिसत असताना त्यांना पक्षाने सुखद धक्का दिला आहे.यामागे नेमकी राजकीय काय उलाढाल झाली हे यथावकाश समजणार आहेच.पण सध्यातरी त्यांची उमेदवारीच्या बाबतीत सरशी झाली आहे.
सत्ताधारी भाजपची उमेदवारांची पहिली यादी नुकतीच जाहीर झाली आहे.या पहिल्याच यादीत कोपरगावात विद्यमान आ. स्नेहलता कोल्हे यांचे विस्मयकारक नाव आले आहे.त्यांनी उमेदवारीची आशा जवळ-जवळ सोडून दिली होती.व सत्ताधारी गटाच्या व्यासपीठावरून पक्ष चिन्हही गायब झाल्याचे दिसत असताना त्यांना पक्षाने सुखद धक्का दिला आहे.यामागे नेमकी राजकीय काय उलाढाल झाली हे यथावकाश समजणार आहेच.
आता पाच वर्षाच्या वादग्रस्त कारभारावर मतदार त्यांना किती स्वीकारतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.तर शिवसेनेने हि जागा सोडण्यासाठी आपली बरीच शक्ती वाया घातल्याचे दिसून आले आहे.मात्र त्या कुरघोड्यात बाजारभाव जाहीर झाल्याने भाजपचा भाव वाढून गेल्याचे मानले जात आहे.आता राष्ट्रवादी हा एक पर्याय त्याच पक्षाचे प्रस्तावित उमेदवार व कर्मवीर काळे कारखान्याचे अध्यक्ष आशुतोष काळे यांच्या समोर आहे.मात्र मतदारांसमोर वर्तमानात काँग्रेस व राष्ट्रवादी हे दोन्ही पर्याय समाधान न देणारे असल्याने त्याना अपक्ष उमेदवारी हाच एक पर्याय शिल्लक दिसत असून ते तोच पर्याय निवडण्याची शक्यता दिसत आहे.दरम्यान नरेंद्र मोदी मंचचे उमेदवार व कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांच्या समोर आता अपक्ष निवडणूक लढवणे हाच पर्याय राहिल्याचे दिसत आहे. कोपरगाव विधानसभा निवडणुकीत आता खरी तिरंगी लढत होण्याची शक्यता वाढली असून गोदावरी दुध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे याना लोणीवरून आदेश आल्यावर आपली तलवार म्यान करावी लागणार आहे.तर शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रमोद लबडे यांना आता अपक्ष निवडणूक लढणे किंवा आपली तलवार म्यान करणे हेच पर्याय राहिल्याचे दिसत आहे.त्यांची वरिष्ठ सेना नेते आता कसे समजावतात कि एखाद्या पदाची लालूच दाखवतात हे महत्वाचे ठरणार आहे.त्यामुळे हे दोन्ही उमेदवार कोणती भूमिका घेतात याकडे मतदारांचे लक्ष लागून आहे.