जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
नगर जिल्हा

शिर्डी मतदारसंघातून विधीज्ञ अजित काळेंनीं उमेदवारी करावी- दुष्काळी शेतकऱ्यांची गळ

जाहिरात-9423439946

संपादक -नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी )

उत्तर नगर जिल्ह्यातील अवर्षणग्रस्त 182 गावांना निळवंडेचे पाणी मिळवण्यासाठी उच्च न्यायालयात शेतकऱ्यांसाठी मोफत न्यायिक लढा लढणारे निळवंडे कालवा कृती समितीचे प्रसिद्ध वकील अजित काळे यांनी शिर्डी विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवावी अशी मागणी निळवंडे लाभक्षेत्रातील शेतकरी व जेष्ठ नेते नानासाहेब गाढवे व संजय गुंजाळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केली आहे.

राज्यात विधानसभा निवडणूक येत्या 21 ऑक्टोबर रोजी होऊ घातली आहे.त्यासाठी 27 सप्टेंबर पासून इच्छुक उमेदवारांनी आपले नामनिर्देशन पत्र भरण्यास प्रारंभ केला आहे.नामनिर्देशन पत्र भरण्यास अद्याप दोन दिवस बाकी असताना शिर्डी विधानसभा मतदारसंघात अद्याप विरोधकांना उमेदवार मिळणे मुश्किल झाले आहे.शिर्डी.आणि संगमनेर विधानसभा मतदार संघात अद्याप कोण निवडणूक लढवणार या बाबत तर्कवितर्क सुरु असून या मतदारसंघात अद्याप सक्षम उमेदवार मिळालेला नाही.त्यामुळे या मतदार संघात उमेदवाराची शोधाशोध सुरु असतांना जेष्ठ नेते नानासाहेब गाढवे व संजय गुंजाळ यांनी हि मागणी केल्याने नवीन चर्चेला सुरुवात झाली आहे.

29 ऑगष्ट रोजी वकील अजित काळे यांनी उच्च न्यायालयात या कालव्यांना अद्याप कुठलाही निधी प्राप्त नाही व त्यासाठी अर्थ संकल्पात तरतूद केलेली नसल्याने न्यायालयाचे लक्ष वेधून घेतले होते.व या प्रकल्पाच्या कालव्यांना निधी कुठून-कुठून उपलब्ध करणार,कधी करणार,व प्रकल्पाचे काम कधी मार्गी लावणार या बाबतचे प्रतिज्ञापत्र देण्याची न्यायालयाकडे मागणी केली होती.न्यायालयाने त्याची गंभीर दाखल घेत सरकारला या संबंधी प्रतिज्ञापत्र देण्याचे फर्मान काढले असून सत्ताधारी धांदात बाराशे कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याचे खोटे सांगत आहेत.सरकारने हे प्रतिज्ञापत्र देण्यासाठी नुकतीच एक आठवड्याची मुदतवाढ घेतलेली आहे हे इथे विशेष !

राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघांची निवडणूक आता रंगात येत असून भाजप-शिवसेना युतीने ,कॅओंग्रेस राष्ट्रवादी-आघाडीने आपली पहिली यादी जाहीर केली आहे,त्यामुळे त्यांना अनेकांची नाराजी झेलावी लागत असून सत्ताधारी गटावरील बरेच नाराज राष्ट्रवादी व काँग्रेसकडे धावू लागले आहेत.या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वाधिक चर्चेत असलेल्या शिर्डी व संगमनेर मतदारसंघात मंत्री राधाकृष्ण विखे व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात कोण उभे ठाकणार याकडे राज्याचे लक्ष लागून लागले आहे.या मात्तबरांच्या विरोधात उमेदवार देण्यात विरोधी पक्षांना अपयश येताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर गाढवे व गुंजाळ यांच्या मागणीने लक्ष वेधून घेतले आहे.अड् अजित काळे यांचा शेतकरी संघटनेशी जवळचा संबंध असून ते शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांचे सहकारी व प्रदेश उपाध्यक्ष स्व. बबनराव काळे यांचे सुपुत्र असून त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जवळपास पंचवीस वर्ष वकिली केली असून ते वकील संघाचे माजी अध्यक्ष आहे.

विधीज्ञ अजित काळे यांनी यापूर्वी 19 व वीस डिसेंबर रोजी सलग दोन दिवस सुनावणी घेऊन उत्तर नगर जिल्ह्यातील पुढाऱ्यांनी आपल्या दारू कारखान्यांना पाणी पळविण्यासाठी निळवंडेच्या लाभक्षेत्राबाहेरील शिर्डी व कोपरगाव या शहराचे नाव पुढे करून पाणी नेण्याचा डाव आखून सरकारची दिशाभूल करून मंजुऱ्या मिळवल्या होत्या.त्यांना चाप लावण्यात कालवा कृती समितीस मदत करण्यात वकील अजित काळे यांनी अहंम भूमिका निभावली आहे.व त्यास स्थगिती दिलेली आहे.

या शिवाय त्यांच्याकडे रघुनाथ दादा यांनी युवा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष या पदाची जबाबदारी सोपवलेली आहे.त्यांनी गत 48 वर्षांपासून उत्तर नगर जिल्ह्यातील अवर्षणग्रस्त 182 गावांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे कालव्यांच्या कामांना निळवंडे कालवा कृती समितीने सप्टेंबर 2016 साली दाखल केलेल्या जनहित याचिकेची (पी.आय.एल.133/2016 ) सुनावणी कुठलेही शुल्क न घेता करत असून त्यांच्या या सहकार्यामुळेच अकोले तालुक्यात साखर सम्राटांनी एकत्र येऊन बंद केलेल्या कालव्यांची कामे सुरु करण्याचे आदेश औरंगाबाद उच्च न्यायालयाने 3 मे रोजी दिले होते.या शिवाय 29 ऑगष्ट रोजी उच्च न्यायालयात या कालव्यांना अद्याप कुठलाही निधी प्राप्त नाही व त्यासाठी अर्थ संकल्पात तरतूद केलेली नसल्याने न्यायालयाचे लक्ष वेधून घेतले होते.व या प्रकल्पाच्या कालव्यांना निधी कुठून-कुठून उपलब्ध करणार,कधी करणार,व प्रकल्पाचे काम कधी मार्गी लावणार या बाबतचे प्रतिज्ञापत्र देण्याची न्यायालयाकडे मागणी केली होती.न्यायालयाने त्याची गंभीर दाखल घेत सरकारला या संबंधी प्रतिज्ञापत्र देण्याचे फर्मान काढले असून सत्ताधारी धांदात बाराशे कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याचे खोटे सांगत आहेत.सरकारने हे प्रतिज्ञापत्र देण्यासाठी नुकतीच एक आठवड्याची मुदतवाढ घेतलेली आहे हे इथे विशेष ! अजित काळे यांनी यापूर्वी 19 व वीस डिसेंबर रोजी सलग दोन दिवस सुनावणी घेऊन उत्तर नगर जिल्ह्यातील पुढाऱ्यांनी आपल्या दारू कारखान्यांना पाणी पाठविण्यासाठी निळवंडेच्या लाभक्षेत्राबाहेरील शिर्डी व कोपरगाव या शहराचे नाव पुढे करून पाणी पळविण्याचा डाव आखून सरकारची दिशाभूल करून मंजुऱ्या मिळवल्या होत्या.त्यांना चाप लावण्यात कालवा कृती समितीस मदत करण्यात वकील अजित काळे यांनी अहंम भूमिका निभावली आहे.व त्यास स्थगिती दिलेली आहे.तरीही आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेऊन काही संधिसाधू राजकारणी सदर बाब न्यायालयात प्रलंबित असतानाही मतदारांना थापा मारून बनवा-बनवाबनवी करताना दिसत आहेत.व मुंबईस्थित भाजपचे सत्ताधारी नेते त्याच्या हो-त -हो मिळवत असून या प्रवृत्तीना ठेचण्याच्या कामात विधिज्ञ अजित काळे यांनी निर्णायक भूमिका निभावली आहे.त्यांनी अनेक रखडलेल्या प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनांची कामे मार्गी लावण्यासह,शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव मिळण्यासाठी सरकारला स्वतः न्यायालयात खेचले आहे. त्यामुळे या सत्ताधाऱ्यांना शेतकरी हित जोपासण्यासाठी अशाच माणसाची नितांत गरज आहे.त्यामळे अजित काळे यांनीच आता शेतकऱ्यांच्या हित संरक्षणासाठी अजित काळे यांच्या सारख्या चांगले चारित्र्य असलेल्या वकीलानेच आमची विधानसभेत वकिली करावी असे आवाहनही शेतकऱ्यांच्या वतीने नानासाहेब गाढवे,संजय गुंजाळ यांनी शेवटी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close