जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी शिर्डीत कोरोना उपचार केंद्र सुरु करणार-पालकमंत्री

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा उद्रेक मोठ्याप्रमाणात वाढला असून अहमदनगर जिल्ह्यात जवळपास सर्वच तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढतच असल्याने आगामी काळात उत्तर नगर जिल्ह्यातील रुग्णांसाठी शिर्डी येथील साई संस्थानचे रुग्णालय ताब्यात घेऊन या भागातील रुग्णांची उपचाराची सोय करण्यात येणार असून साई संस्थानकडून प्राण वायूची निर्मिती केंद्र सुरु करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री तथा नगर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.हसनजी मुश्रीफ यांनी आज कोपरगाव येथे बोलताना केले आहे.

“शिर्डी परिसरातील कोरोना रुग्णांना ऑक्सिजन अपुरा पडत असल्याने आगामी काळात साधारण महिनाभरात शिर्डी या ठिकाणी नवीन ऑक्सिजन निर्मिती केंद्र बनविणार आहे.त्यामुळे नजीकच्या रुग्णांना ते सोयीचे पडणार आहे.याशिवाय रुग्णांना जवळपास लवकर उपचार भेटण्यासाठी उपविभागीय वाहतूक अधिकारी यांचेशी बोलून आपण नवीन कार्डियाक रुग्णवाहिका उपलब्ध करणार आहे”-ना.हसन मुश्रीफ,पालकमंत्री नगर जिल्हा.

देशातील कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणाबाहेर जाताना दिसत आहे.केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या अहवालानुसार शुक्रवारी देशात २.३४ लाख कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली आहे.शुक्रवारी एकाच दिवशी आतापर्यंत सर्वाधिक म्हणजे १३४१ लोकांचा जीव गेला आहे. गेल्या २४ तासात १.२३ लाख रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.कोपरगाव सह नगर जिल्ह्यातही कोरोना वाढीचा उद्रेक झाला असून शासकीय यंत्रणा तोकडी पडताना दिसत आहे.जिल्ह्यात प्राणवायू व कोरोना नियंत्रणासाठी महत्वाची भूमीका निभावणाऱ्या रेमडेसीविर या इंजेक्शनची कमतरता मोठ्या प्रमाणावर जाणवत असल्याच्या पार्श्वभूमीवर आज जिल्ह्याचे पालकमंत्री ना.हसन मुश्रीफ यांनी आज कोपरगाव तालुक्याचा दौरा केला आहे.त्यावेळी कृष्णाई मंगल कार्यालयात आढावा बैठक आयोजित केली होती त्यावेळी ते बोलत होते.
सदर प्रसंगी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले,पोलिस अधीक्षक डॉ.मनोज पाटील,खा.सदाशिव लोखंडे,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.पोखरणा,प्रांताधिकारी गोविंद शिंदे,पोलिस उपअधीक्षक संजय सातव,पंचायत समिती सभापती पौर्णिमा जगधने,उपसभापती अर्जुन काळे,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम,नगराध्यक्ष विजय वहाडणे,शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे,मुख्याधिकारी प्रशांत सरोदे,कोपरगाव ग्रामीणचे पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव,कोपरगाव शहराचे पोलिस निरीक्षक वासुदेव देसले,गटविकास अधिकारी सचिन सुर्यवंशी,ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉ.कृष्णा फुलसुंदर,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संतोष विधाते,नायब तहसीलदार मनिषा कुलकर्णी,डॉ.वैशाली बडदे,सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता प्रशांत वाकचौरे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष संदिप वर्पे,महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमशेठ बागरेचा,नगरसेवक गटनेते विरेन बोरावके,मंदार पहाडे,अजीज शेख,डॉ.योगेश कोठारी,डॉ.तुषार गलांडे,शहरप्रमुख कलविंदर डडियाल,युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष तुषार पोटे,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नितीन शिंदे,मनसेचे तालुकाध्यक्ष अनिल गायकवाड,उपजिल्हा प्रमुख संतोष गंगवाल आदी मान्यवर उपस्थित होते.सदर प्रसंगी पुढे बोलताना ते म्हणाले की,”वर्तमानातं कोरोनाचे संकट मोठे असून या वेळच्या लाटेत कोरिनाच्या नवीन स्ट्रेन हा धोकादायक असून एका व्यक्ती पासून जवळपास सहाशे जण बाधित होत आहे हि बाब धक्कादायक आहे.हि वाढती रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी उपचारासाठी जवळपास रुग्णालय असणे गरजेचे आहे त्या साठी शिर्डी संस्थान महत्वाची भूमीका निभावू शकेल.म्हणूनच आपण या ठिकाणी रुणांना उपचारासाठी नवीन कोविड सेंटर मंजूर करत आहोत.या शिवाय ऑक्सिजन अपुरा पडत असल्याने आगामी काळात साधारण महिनाभरात या ठिकाणी नवीन ऑक्सिजन निर्मिती केंद्र बनविणार आहे.त्यामुळे नजीकच्या रुग्णांना ते सोयीचे पडणार आहे.याशिवाय रुग्णांना जवळपास लवकर उपचार भेटण्यासाठी उपविभागीय वाहतूक अधिकारी यांचेशी बोलून आपण नवीन कार्डियाक रुग्णवाहिका उपलब्ध करणार असल्याची घोषणाही त्यांनी केली आहे.शिवाय कोविड उपचारासाठी प्रत्येक आमदार यांना एक कोटींचा निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी या वेळी शेवटी सांगितलें आहे.

सदर प्रसंगी आ.काळे म्हणाले कि,”कोपरगाव तालुक्यात वाढत असलेल्या कोरोना बाधित रुग्ण संख्येचा विचार करून कोपरगाव तालुक्यात आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत.एस.एस.जी.एम.महाविद्यालयात १०० ऑक्सिजन बेड व महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्ट येथे ५०० बेडचे जम्बो कोविड केअर सेंटर सुरु केले आहे. परंतु ऑक्सिजन व रेमडेसिवीर औषधांची टंचाई जाणवत आहे.यामुळे जास्तीत जास्त प्रमाणात ऑक्सिजन व रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा कोपरगाव विधानसभा मतदार संघाला करण्यात यावा व कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाला रुग्णवाहिका मिळावी अशी मागणी केली आहे.सदर प्रसंगी खा.सदाशिव लोखंडे आदींनी कोरोनाबाबत अडचणींचा पाढा वाचला आहे.तर नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी,”कोरोनावर उपचार करणाऱ्या अधिकारी,वैद्यकीय उपचार करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.व सरकारी प्राध्यापक.शिक्षक,आदींनी या यंत्रणेला सहकार्य करावे” असे आवाहन केले आहे.सदर प्रसंगी माजी आ.कोल्हे यांनी सरकारवर व कोपरगावातील यंत्रणेवर टीका करण्यास सुरुवात केली असता त्यावेळी त्यांचे खंडन करण्यासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांचेकडे माइक देत नेमकी संधी दिली त्यावेळी ते म्हणाले कि,”कोपरगाव तालुक्यात वाढत असलेल्या कोरोना बाधित रुग्ण संख्येचा विचार करून कोपरगाव तालुक्यात आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत.तरीही काही जण केवळ प्रसिद्धीसाठी खटाटोप परत असल्याबाबत माजी.आ.स्नेहलता कोल्हे यांचे नाव न घेता टीका केली आहे.त्या वेळी माजी आमदार यांना गप्प बसण्याशिवाय पर्याय राहिला नाही.त्याची उपस्थितांत चांगलीच चर्चा रंगली होती.विशेष म्हणजे असाच अनुभव महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात यांचेही आढावा बैठकीत आला होता.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close