आरोग्य
वारी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण मोहीम यशस्वी
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील वारी येथिल प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण मोहिमेने वेग घेतला असुन आरोग्य अधिकारी डॉ.पाखरे,डॉ.बोर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक आरोग्य केंद्र वारीचे कर्मचारी,आशा सेविकांच्या मदतीने उत्तम प्रकारे नियोजन करून कोविशिल्ड लस देण्यात येत आहे. कोपरगाव तालुक्यात कोरोना साथीने थैमान घातले असुन आरोग्य अधिकारी व कर्मचारी साथ आटोक्यात आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न करीत आहेत रूग्ण शोधुन उपचारासाठी पाठविले जात आहेत तसेच जनजागृती करून मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम सुरु आहे
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या अहवालानुसार शुक्रवारी देशात २.३४ लाख कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली आहे.शुक्रवारी एकाच दिवशी आतापर्यंत सर्वाधिक म्हणजे १३४१ लोकांचा जीव गेला आहे.कोपरगाव तालुकाही त्याला अपवाद नाही त्यामुळे लसीकरणाचा वेग वाढविणे गरजेचे बनले आहे.वारी ग्रामपंचायत हद्दीत हा वेग वाढविण्यात आला आहे.हि समाधानाची बाब आहे.
देशातील कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणाबाहेर जाताना दिसत आहे.केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या अहवालानुसार शुक्रवारी देशात २.३४ लाख कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली आहे.शुक्रवारी एकाच दिवशी आतापर्यंत सर्वाधिक म्हणजे १३४१ लोकांचा जीव गेला आहे.कोपरगाव तालुकाही त्याला अपवाद नाही त्यामुळे लसीकरणाचा वेग वाढविणे गरजेचे बनले आहे.वारी ग्रामपंचायत हद्दीत हा वेग वाढविण्यात आला आहे.हि समाधानाची बाब आहे.
वारी प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथम बाहेरच नोंदणी करुन गर्दी होऊ नये यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी प्रयत्न करतात सामाजिक अंतर पाळत योग्य नियोजन करून याठिकाणी लसीकरण सुरू असल्याचे सरपंच सतिष कानडे यांनी सांगितले व या कठीण काळात आरोग्य कर्मचारी करीत असलेल्या नियोजन बध्द कामाबद्दल समाधान व्यक्त केले आहे.
वारीचे प्रथम लोकनियुक्त सरपंच सतिष कानडे,पंचायत समिती सदस्य मधुकरराव टेके,माजी सभापती मच्छिंद्र टेके,माजी सरपंच रावसाहेब टेके, माजी पंचायत समिती सदस्य अशोकराव कानडे,कोपरगाव शिवसेना तालुकाप्रमुख शिवाजी ठाकरे,राजेंद्र वाळुंज,तान्हाजी थोरमिशे ,पत्रकार रोहीत टेके फकीर टेके,जनार्धन जगताप तसेच संजय समरीत,अनिल दवणे,कैलास सातपुते,वीरभद्र विद्यालय धोत्रा,रामेश्वर विद्यालय शिक्षक ,दि. गोदावरी बायोरिफायनरी लिमिटेड साकरवाडीचे सर्व अधिकारी कर्मचारी यांच्यासह परिसरातील वारी साकरवाडी,कान्हेगाव,धोत्रा,भोजडे,खोपडी,सडे,शिंगवे येथील असंख्य नागरिकांनी ही लस घेतली असुन बुधवारी १४ एप्रिल रोजी उच्चांक नोंदवत १२७ च्या वर नागरिकांनी लसीकरण करून घेतले आहे.आरोग्य अधिकारी व नर्स,औषध निर्माता व सर्व स्टाफ करीत असलेल्या योग्य नियोजनाबद्दल सर्वपक्षीय ग्रामस्थ पदाधिकारी यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना धन्यवाद दिले आहेत.