जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात एकास मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील सराफ बाजार येथील रहिवाशी असलेला तरुण अमित विलास कदम ( वय-19) यास कोपरगाव येथील आरोपी निशांत राजेंद्र झावरे,मयूर दळवी, मोन्या दळवी,व एक अनोळखी इसम यांनी पांडे गल्लीत अडवून लोखंडी रॉडने पायावर ,हातावर मारून गंभीर जखमी करून शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा दाखल झाली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे कि, फिर्यादी हा कोपरगाव येथील सराफ बाजार येथील रहिवासी आहे.मी माझे कापडाचे दुकानात कामाला जात असताना आपला भाउ अमित यास मी फोन केला तो त्याने का उचलला नाही असा निशांत झावरे याने सवाल करत त्याने व टायचे साथीदार मयूर दळवी,मोन्या दळवी व एक अनोळखी तरुण अशा चौघांनी मिळून आपणास मुंबादेवी तरुण मंडळाचे समोर पांडे गल्लीत त्यास शनिवारी दुपारी सडे चारच्या सुमारास कामावर जात असतांना त्यास अडवून लोखंडी रॉडने हातावर,पायावर मारून गंभीर जखमी केले व शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे.या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी आपल्या दप्तरी गु.र.न.317\2019 भा. द. वि.कलम 326,323,504,506 अन्वये आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार भालेराव हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close