जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

माजी सैनिकांचे समस्या निकारणास प्राधान्य-तहसिलदार

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील माजी सैनिकांचे समस्या निकारणास प्रशासनाचे सदैव प्रयत्नशील राहिल असे आश्वासन कोपरगावचे तहसिलदार योगेश चंद्रे यांनी नुकतेच एका कार्यक्रमात दिले आहे.

अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेन्द्र भोसले, उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली महसूल विजय सप्तपदी आणि महाराजस्व अभियान अहमदनगर जिल्ह्यात सुरु आहे त्या अंतर्गत हा कार्यक्रम संपन्न झाला आहे.

अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेन्द्र भोसले, उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली महसूल विजय सप्तपदी आणि महाराजस्व अभियान अहमदनगर जिल्ह्यात सुरु आहे.कोपरगाव तालुक्यातील आजी-माजी सैनिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आढावा बैठकीचे आयोजन तहसिल कार्यालय कोपरगाव येथे करण्यात आले होते.त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

सदर प्रसंगी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विजय वाकचौरे,जिल्हा सैनिक कल्याण संघटक,बाळु उमाजी ठाणगे,सहाय्यक जिल्हा सैनिक अधिकारी दत्तात्रय शिंदे,सैनिकी मुलांचे वसतिगृह अधिक्षक सुभेदार अब्दुलमाजिद शेख,कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे निरीक्षक दौलतराव जाधव,शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी,सहाय्यक गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे,भूमी अभिलेख अधिक्षक संजय भास्कर,दुय्यम निबंधक दिलीप निर्हाळी,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते,वीज वितरण अतिरिक्त कार्यकारी अभियंता भगवंत कराटे,आगर व्यवस्थापक अभिजित चौधरी,उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे,माजी सैनिक संघटना अध्यक्ष शांतीलाल होन,संघटनेचे उपाध्यक्ष राघवेंद्र वाडेकर,युवराज गांगवे,तुकाराम रणशूर,निवासी नायब तहसीलदार मनिषा कुलकर्णी,तुरुंग अधिकारी शंकर दुशिंग,यांचेसह वीर नारी,माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी सदस्य व माजी सैनिक आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विजय वाकचौरे यांनी कोपरगाव तालुक्यातील आजी माजी सैनिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आठवड्यातून एक दिवस स्थानिक पातळीवर पत्रव्यवहारास प्रतिनिधी उपलब्ध करून देणार असल्याचे सांगत माजी सैनिकांचे कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी त्या समजून घेवून त्याचा लाभ घ्यावा असे सांगितले.

उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक सुभेदार मेजर मारुती कोपरे यांनी तर सूत्रसंचलन समन्वयक सुशांत घोडके यांनी केले.शेवटी आभार पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close