कोपरगाव तालुका
..तर नवीन साधक उदयाला येतील-सौ. सातभाई
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
नव्या जुन्या साहित्यिकांचा मेळ घालुन तालुकास्तरावर शब्दगंध ने सुरू केलेली शाखा नवोदितांना पाठबळ देईल,व भविष्यात नवीन साहित्यिक उदयाला येतील अशी अपेक्षा माजी नगराध्यक्ष ऐश्वर्या सातभाई यांनी व्यक्त केली आहे.
कोपरगांव येथील हिंदी वाचनालयात शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या तालुका कार्यकारिणीच्या स्थापना प्रसंगी अध्यक्षपदावरून त्या बोलत होत्या.यावेळी शब्दगंधचे संस्थापक सुनील गोसावी,उपाध्यक्ष कवी सुभाष सोनवणे, प्रसिद्धी प्रमुख राजेंद्र फंड,रवींद्र धस आदी.मान्यवर उपस्थितीत होते.
पुढे बोलतांना त्या म्हणाल्या कि,”येथील भुमीला साहित्यिक आणि पौराणिक पाश्वभूमी असल्याने अनेक मान्यवर लेखक,कवी येथे राहून गेले,भविष्यात नवोदिताना मार्गदर्शक ठरतील असे उपक्रम सुरू केल्यास अनेकांना संधी मिळेल.
सुनील गोसावी म्हणाले कि,”आपल्या मनातील भाव भावना कागदावर उतरवल्या तर कथा,कविता तयार होतात,त्या समाजासमोर येण्यासाठी अश्या विचारपीठांची आवश्यकता असते,शब्दगंध ची येथील नवी टिम ती पुर्ण करेल.
यावेळी सुभाष सोनवणे,राजेंद्र फंड,सुधीर कोयटे,वंदना चिकटे यांनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या आहेत.कोपरंगाव तालुका शाखा कार्यकारिणीची पुढीलप्रमाणे निवड जाहिर करण्यात आली आहे.
अध्यक्ष – कैलास साळगट,उपाध्यक्ष-ऐशवर्या सातभाई व सुधीर कोयटे,कार्याध्यक्ष- प्रा.डॉ.संजय दवंगे
सह कार्याध्यक्ष-संदीप बागल,सचिव-प्रा.मधुमीता निळेकर
,सह सचिव-वंदना चिकटे,खजिनदार- प्रमोद येवले
सल्लागार-भानुदास बैरागी व राम गायकवाड,पद्माकांत कुदळे,कार्यकारणी सदस्य-अशोक आव्हाटे,शैलजा रोहम,श्रीकांत बागुल,नंदकिशोर लांडगे,स्वाती मुळे,श्वेतांबरी राऊत, हेमचंद्र भवर,रविंद्र कांबळे यावेळी छोटेखानी कविसंमेलन झाले,शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने ग्रंथालयास पुस्तके भेट देण्यात आली आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कैलास साळगट यांनी केले तर शेवटी प्रमोद येवले यांनी आभार मानले,नुतन कार्यकारणी चे अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत..