जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

चौथ्या आवर्तनाचा निर्णय आ.काळे यांनी घ्यावा-ना.भुजबळ

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव,राहाता तालुक्यांना सिंचनासाठी वरदान ठरणाऱ्या गोदावरी कालव्यांना आवर्तन देण्याचा निर्णय हा आगामी स्थिती पाहून स्थानिक राष्ट्रवादीचे आ.आशुतोष काळे यांनी घ्यावा व शेतकऱ्यांना न्याय दयावा असे आवाहन नाशिक जिल्ह्याचे पालक मंत्री ना.छगन भुजबळ यांनी नुकतेच कोपरगाव येथील बैठकीत केले आहे.त्यामुळे चार आवर्तनाबाबत मिळण्याबाबत शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाल्याचे दिसून आले आहे.

मागील पाच वर्षात गल्लीपासून-दिल्लीपर्यंत त्यांचे सरकार असतांना कोपरगाव विधानसभा मतदार संघाचा कायापालट होईल अशी अपेक्षा नागरिकांना होती.मात्र सत्तेचा दुरुपयोग करून गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रात होणारी बैठक मुंबईला घेणाऱ्या माजी आमदारांना रस्त्यावर निवेदन देण्याची दुर्दैवी वेळ आली- पद्माकांत कुदळे,माजी नगराध्यक्ष,कोपरगाव शहर.

कोपरगावात आज सहा वर्षानंतर प्रथमच कालवा सल्लागार समितीची बैठक प्रथमच कोपरगाव येथे नाशिक जिल्ह्याचे पालक मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.त्यावेळी ते बोलत होते.

सदर प्रसंगी आ.आशुतोष काळे,गोदावरी परजने तालुका दुध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे,कोपरगाव शहराचे माजी नगराध्यक्ष पद्मकांत कुदळे,अजय गर्जे,संजय काळे,संभाजी काळे,अशोक खांबेकर,जि. प.सदस्य सुधाकर दंडवते,सोनाली रोहमारे,राहुल रोहमारे,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष माधवराव खिलारी,माजी जेष्ठ संचालक चंद्रशेखर कुलकर्णी,रमेश गवळी,म.न.से.चे अनिल गायकवाड,संतोष गंगवाल,राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगूले,राहुल देवळालीकर,पंचायत समितीच्या अध्यक्षा पूर्णिमा जगधने,उपसभापती अर्जुन काळे,जलसंपदाचे अधिक्ष अभियंता अलका अहिरराव,कार्यकारी अभियंता सागर शिंदे,अशोक आव्हाटे,सुभाष दवंगे,राजेंद्र खिलारी,कर्मवीर कारखान्याचे संचालक सचिन रोहमारे,सुनील शिंदे,नगरसेवक मंदार पहाडे,नवाज कुरेशी,सागर लकारे,तहसीलदार योगेश चंद्रे,मुख्याधिकारी प्रशांत सरोदे,तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव आदी मान्यवर उपस्थित होते.

त्यावेळी पुढे बोलताना म्हणाले की,”समुद्राला वाहून जाणारे पाणी पूर्वेकडे वळविणे अत्यंत गरजेचे आहे.पश्चिम वाहिनी दमणगंगा,वैतरणा,अंबिका,नारपार व उल्हास या नद्यांचे पश्चिमेकडे समुद्राला वाहून जाणारे ८० टीएमसी पाणी अतितुटीच्या गोदावरी खोऱ्यात वळवून अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नात लक्ष घालून तातडीने कार्यवाही करून हा पाणीप्रश्न सोडवावा लागेल.आपल्याकडे उपलब्ध असलेल्या पाण्यातून एक रब्बी व दोन उन्हाळी आवर्तन देण्याचे पाटबंधारे विभागाने नियोजन केले असले तरी चौथ्या अवर्तनाबाबत आ.काळे यांनी निर्यात घ्यावा.देशातून व जगातून करोना सपंत नाही तो पर्यंत लाख लाख कोटी जी.एस.टी.चे आहे.अनेक ठिकाणी पूर आला त्याला पैसे दिले नाही.आमच्या सरकारने ठरवलेले होते करोना मधून अगोदर नागरिकांना वाचवू यात कोणतेही राजकारण होणार नाही याची काळजी घेतली आहे असेही ते शेवटी म्हणाले आहे.

आ.काळे यांनी गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रातील विविध प्रश्नाकडे ना.भुजबळ यांचे लक्ष वेधले.मागील पाच वर्षापासून कालवा सल्लागार समितीची बैठक मुंबई येथे बैठक होत असल्यामुळे लाभधारक शेतकऱ्यांना आपल्या अडचणी मांडण्यासाठी कोणी वाली नव्हता.त्यासाठी हि बैठक लाभक्षेत्रातच व्हावी यासाठी पाठपुरावा करीत होतो. त्या पाठपुराव्याला पाटबंधारे मंत्री जयंत पाटील यांनी सर्वस्वी अधिकार ना. भुजबळ यांना देऊन डाव्या कालव्याची बैठक कोपरगाव व उजव्या कालव्याची बैठक राहाता येथे घेतल्याबद्दल लाभधारक क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या वतीने त्यांचे आभार मानले.समुद्राला वाहून जाणारे पाणी पूर्वेकडे वळविणे अत्यंत गरजेचे आहे.पश्चिम वाहिनी दमणगंगा,वैतरणा,अंबिका,नारपार व उल्हास या नद्यांचे पश्चिमेकडे समुद्राला वाहून जाणारे ८० टीएमसी पाणी अतितुटीच्या गोदावरी खोऱ्यात वळवून अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नात लक्ष घालून तातडीने कार्यवाही करून हा पाणीप्रश्न सोडवावा.आपल्याकडे उपलब्ध असलेल्या पाण्यातून एक रब्बी व दोन उन्हाळी आवर्तन देण्याचे पाटबंधारे विभागाने नियोजन केले असले तरी उन्हाळी तीन आवर्तने द्यावी अशी मागणी केली.आवर्तनापूर्वी सर्व वितरिका व चाऱ्यांची सफाई सुरु करावी.आवर्तनाची लाभक्षेत्रातील टेल पासून हेड पर्यंत सर्वच लाभधारक शेतकऱ्यांना आवर्तन मिळावे.कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे.शेतकऱ्यांना आवश्यक असलेली पाण्याची मागणी पाटबंधारे विभागाला माहिती व्हावी यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सात नंबर पाणी मागणी अर्ज दाखल करावेत असे आवाहन केले.

या वेळी उपस्थित माहिती अधिकार कार्यकर्ते संजय काळे म्हणाले की,”सात क्रमांकाचा अर्ज भरायला अधिकारी नेमून ते अर्ज शेतकऱ्यांना मिळाले पाहिजे,नगर पालिकेची लूट थांबवा,धरण भरलेले असताना आम्हाला पाणी का मिळत नाही.दर एकवीस दिवसाला आम्हाला आवर्तन मिळाले तर आमच्या शेतकऱ्यांचे पीक येतील व शेतकरी चिंता मुक्त होईल,आपण सातवा वेतना प्रमाणे पगार घेता त्याप्रमाणे काम करून आम्हाला पाणी द्यावे .

माजी नगरपरिषदेचे गटनेते अजय गर्जे म्हणाले की,”गेल्या पाच वर्षात याठिकाणी कोणतेही काम झाले नाही,कोपरगाव कारांचे पाण्याचे स्वप्न आ. काळे व ना.भुजबळ यांनी पूर्ण करावे,आशुतोष काळे आमदार झाल्यानंतर खऱ्या अर्थाने कोपरगाव तालुक्यात विकासाचे काम सुरू झाले आहेत.कालवा दुरुस्ती होणे गरजेचे असून ते लवकरात लवकर करावे असे आवाहन केले आहे.

राजेश परजणे म्हणाले की,समन्यायी पाणी वाटपाचा कायदा आमच्या माथी मारलेला आहे,राज्यातील कोणत्याही धरणाला नाही,हा कायदा रद्द करावा,त्यामुळे आमच्या वाट्याला पाणी येईल,आणि कालवे दुरुस्ती करूनच पाणी सोडावे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close