जाहिरात-9423439946
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहर व तालुक्यात शहरातील अनेक मान्यवरांना कोरोनाने गाठले असताना आज कोपरगाव तालुक्यात एकूण ४६ अँटीजन रॅपिड टेस्ट करण्यात आल्या असून त्यात ०१ रुग्ण बाधित आले आहे.तर नगर येथे तपासणीसाठी ०७ स्राव पाठविण्यात आले आहे.आज आलेल्या अहवालात खाजगी प्रयोग शाळेतील अहवालात एकही रुग्ण बाधित आढळला नसल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी कृष्णा फुलसौन्दर यांनी दिली आहे.

नगर जिल्ह्यात बाधित रुग्णांचा आकडा ५७ हजार ३५४ जाऊन पोहचला आहे.तर आता पर्यंत जणांनी आपले प्राण देऊन किंमत चुकवली ८९७ आहे.कोपरगाव तालुक्यातील गत काही दिवसातील रुग्ण धरून ३७ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे.गत काळात ग्रामीण भागात अधिक प्रमाणावर रुग्ण होते आता मात्र ते कमी झाले आहे.हि समाधानाची बाब आहे.
दरम्यान कोपरगाव शहरात आज एकही रुग्ण बाधित आढळला नाही.तर ग्रामीण भागात सोनेवाडी येथील एक महिला रुग्ण वय-८१,बाधित आढळला आहे.
दरम्यान आज कोपरगाव तालुक्यात एकूण बाधित रुग्णांची संख्या ०२ हजार १९१ इतकी झाली आहे.त्यात ३१ रुग्ण सक्रिय आहेत,तर आज पर्यंत ३७ जणांचे कोरोना साथीने निधन झाले आहे.आजपर्यंत कोपरगाव तालुक्याचा मृत्युदर १.६८ टक्के आहे.आतापर्यंत १२ हजार ६८२ जणांचे श्राव तपासले आहेत यातून बाधित रुग्णांचा दहा लाखाला ५० हजार ७२८ इतका आढळला आहे.तर बाधित रुग्ण दर १७.२७ असा आढळला आहे तर आतापर्यंत कोरोनातून उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णाची संख्या ०२ हजार १२३ इतकी झाली आहे.टक्केवारीत हा दर ९६.८९ टक्के झाला आहे.दरम्यान ग्रामीण व शहरी भागातील बाधित आकडेवारी कमी झाल्यामुळे नागरिकांत समाधान निर्माण झाले आहे. तरी मात्र नागरिकांनी आगामी काळात प्रतिबंधात्मक उपायाबाबत अजून दक्षता घेतल्यास रुग्ण वाढ रोखता येईल असा विश्वास तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते यांनी शेवटी म्हटले आहे.