जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कालवा सल्लागार समितीची बैठक कोपरगावात !

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपारगाव-(प्रतिनिधी)

गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रात कालवा सल्लागार समितीची बैठक घ्यावी या मागणीला यश मिळाले असून गोदावरी डावा तट कालव्याच्या सल्लागार समितीची बैठक शनिवार (दि.७) रोजी कोपरगाव येथे उजव्या तट कालव्याची राहाता येथे आयोजित केली आहे या बैठकीसाठी शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात केले आहे.

मागील पाच वर्षांपासून भाजप सरकारच्या काळात कालवा सल्लागार समितीची बैठक ही मुंबई येथे होत होती.त्यामुळे शेतकऱ्यांना या बैठकीसाठी उपस्थित राहाता येत नव्हते ही त्रुटी महाआघाडी सरकारने दूर केली आहे-आ.आशुतोष काळे

दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात आ. काळे यांनी असे म्हटले आहे की,”मागील पाच वर्षांपासून भाजप सरकारच्या काळात कालवा सल्लागार समितीची बैठक ही मुंबई येथे होत होती.त्यामुळे शेतकऱ्यांना या बैठकीसाठी उपस्थित राहाता येत नव्हते. यासाठी ही बैठक गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रातच घ्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी होती. शेतकऱ्यांना मिळणाऱ्या आवर्तनाची व या बैठकीत झालेल्या निर्णयाची माहिती मिळून आपल्या पिकांचे नियोजन करता यावे यासाठी मागील पाच वर्षांपासून पाठपुरावा सुरू होता.राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होताच जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील व ना.छ्गन भुजबळ यांच्याकडे देखील ही मागणी लावून धरली होती. त्या मागणीला अपेक्षित यश मिळाले असून कालवा सल्लागार समितीची बैठक आता कोपरगाव मध्ये होणार आहे.
त्याची अंमलबजावणी सुरू झाली असून दारणा प्रकल्प अंतर्गत गोदावरी कालव्यांच्या रब्बी व उन्हाळा हंगाम सन २०२०/२१ चे नियोजन संदर्भात कालवा सल्लागार समितीची बैठक नासिक जिल्ह्याचे पालकमंत्री तथा अन्न, व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण मंत्री ना. भुजबळ यांचे अध्यक्षतेखाली डावा तट कालव्याची शनिवारी सकाळी १०.०० वाजता कृष्णाई मंगल कार्यालय येथे व उजव्या तट कालव्याची दुपारी २.३० वाजता राहाता येथील उपविभागाचे निरीक्षण गृह येथे होणार असून या बैठकीसाठी
शेतकऱ्यांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी शेवटी केले आहे.

Related Articles

Close