जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात ..या कारखान्याचा धुराडा पेटला !

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

जगभर कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. त्या पार्श्वभूमीवर यावर्षी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम त्यांच्या सुविद्य पत्नी अरुणा रोहोम यांच्या हस्ते विधिवत पूजा करून माजी आ. अशोक काळे यांच्या अध्यक्षतेखाली व आ.आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत साध्या पद्धतीने उत्साहाच्या वातावरणात पार पडला आहे.

या वर्षी गळीत हंगामावर कोरोना साथीचे सावट आहे. अशा परिस्थितीत गळीत हंगाम सुरु करणे हे जोखमीची बाब बनली आहे. त्यामुळे प्रत्येक पाऊल सावधपणे टाकणे गरजेचे आहे.त्यामुळे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम साध्या पद्धतीने व प्रसिद्धी माध्यमांना टाळून करण्यात आला आहे.

यावर्षी गळीत हंगामावर कोरोना साथीचे सावट आहे. अशा परिस्थितीत गळीत हंगाम सुरु करणे हे जोखमीची बाब बनली आहे. त्यामुळे प्रत्येक पाऊल सावधपणे टाकणे गरजेचे आहे.त्यामुळे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२०/२१ या वर्षाच्या ६६ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ साध्या पद्धतीने व मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थित करण्याचा निर्णय आ. आशुतोष काळे यांच्या सूचनेवरून कारखाना व्यवस्थापनाने घेतला होता. त्यानुसार हा कार्यक्रम संचालक मंडळ व कारखाना अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अत्यंत साध्या पद्धतीने पार पडला.

यावेळी कारखान्याचे
सर्व संचालक मंडळ,कारखान्याचे कार्यकारी संचालक गिरीश जगताप,जनरल मॅनेजर सुनील कोल्हे, आसवणी विभागाचे जनरल मॅनेजर ज्ञानेश्वर आभाळे, सेक्रेटरी बाबा सय्यद,असि.वर्क्स मॅनेजर दौलतराव चव्हाण, चीफ इंजिनिअर निवृत्ती गांगुर्डे, चिफ केमिस्ट सुर्यकांत ताकवणे आदी मान्यवर सुरक्षित अंतर ठेवून उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन जनरल मॅनेजर सुनील कोल्हे यांनी केले तर संचालक ज्ञानदेव मांजरे यांनी उपस्थितांचे स्वागत करून आभार मानले आहे.

Related Articles

Close