कोपरगाव तालुका
रेल्वे स्थानकात लहान मुलगी सापडली
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव रेल्वे स्थानकात काल दुपारी एक लहानगी साधारण दोन वर्षांची एक मुलगी सापडली असून तिला अद्याप बोलता येत नसल्याने ती नेमकी कोणाची,कुठून आली या बाबत कोणालाही काही सांगता येत नसल्याने याबाबाबत कोणालाही काही महिती असल्यास कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात संपर्क साधावा असे आवाहन पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी केले आहे.
सदरची मुलगी कोपरगाव रेल्वेस्टेशन व शिंगणापुर ग्रामपंचायत हद्दीतील सापडली आहे. तरी तिचे नातेवाईक कुणी असतील तर त्यांनी लगेच कोपरगाव शहर पोलीस स्टेशन शी संपर्क साधावा असे आवाहन कोपरगाव शहर पोलिसांनी केले आहे.