जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

जेऊर-कुंभारीत तरुणाची आत्महत्या !

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी ग्रामपंचायत हद्दीत अशोक अण्णासाहेब दौन्ड यांचे शेतात आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास याच गावातील तरुण आनंद वामन पालवे (वय-३०) याने अज्ञात कारणाने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली असल्याची खबर सरिता वामन पालवे (वय-२१) यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दिल्याने जेऊर कुंभारी परिसरात खळबळ उडाली आहे.

या बाबद सविस्तर वृत्त असे की,”जेऊर कुंभारी ग्रामपंचायत हद्दीत पुणतांबा फाट्यानाजीक मयत तरुण पवार वस्तीवर रहिवासी होता.दुपारी दीड वाजेच्या सुमारास त्याने अज्ञात कारणाने त्यांच्या वस्तीजवळ असलेल्या अशोक दौन्ड यांच्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेतला आहे.हि बाब काही वेळाने नजीकच्या नागरिकांच्या लक्षात आली.त्यांनी त्यास तातडीने कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ भरती केले असता तेथे उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले आहे.

या प्रकरणी मृतांची बहीण सरिता पालवे हिने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात याबाबत अकस्मात मृत्यू दप्तर नोंद क्रं.४८/२०१९ सि.आर.पी.सी.१७४ प्रमाणे याची नोंद केली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.आर.पी.पुंड हे करीत आहेत.दरम्यान मृताने हे कृत्य व्यसनांच्या आहारी जाऊन केल्याची चर्चा नागरिकांत ऐकायला मिळत आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close