कोपरगाव तालुका
कोकमठाणचा विकास सुरु ठेवणार-आश्वासन
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
गत वर्षी संपन्न झालेल्या विधानसभा निवडणुकीत कोकमठाण येथील मतदारांनी आपल्याला भरभरून साथ दिल्याने आपण त्यांच्या गावात विकासाच्या विविध योजना राबवून त्यांना न्याय देणार असल्याचे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून कोपरगाव तालुक्याच्या ग्रामीण भागातील जनतेला विकास काय असतो याची अनुभूती आली.विकासकामे करतांना सर्व जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्यांनी अंग झोकून केलेल्या कामामुळे विकासाचे नवे पर्व ग्रामीण भागात सुरु झाले आहे-आ.काळे
कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथे जिल्हा परिषद सदस्या सोनाली साबळे यांच्या स्थानिक विकास निधीतून अल्पसंख्यांक बहुल ग्रामीण क्षेत्र अंतर्गत मुस्लीम कब्रस्तान वाल कंपाऊंड व सुशोभिकरण खर्च ५ लक्ष, समाज कल्याण विभाग मार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर मध्ये बंदिस्त गटार खर्च ७ लक्ष रुपये, जिल्हा नियोजन अंतर्गत शाळा खोली बांधकाम खर्च ८ लक्ष, शाळा कंपाऊंड दुरुस्ती २ लक्ष व जनसुविधा योजने अंतर्गत ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारत भूमिपूजन ९ लक्ष रुपये अशा एकून ३१ लक्ष रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते पार पडले याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्या सोनाली साबळे होत्या.
याप्रसंगी पंचायत समिती सभापती पौर्णिमाताई जगधने, उपसभापती अर्जुन काळे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, जिल्हा परिषद सदस्या सोनाली साबळे,पंचायत समिती सदस्य मधुकर टेके,कोपरगाव जिनिंग व प्रेसिंग सोसायटीचे अध्यक्ष गोरक्षनाथ जामदार,गटविकास अधिकरी सचिन सूर्यवंशी,उपअभियंता उत्तमराव पवार,गटशिक्षण अधिकारी श्री. काळे, प्रशासक आर.टी.दिघे,ग्रामसेवक डी. बी. गायकवाड,आदी उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना म्हणाले की,”जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून कोपरगाव तालुक्याच्या ग्रामीण भागातील जनतेला विकास काय असतो याची अनुभूती आली.विकासकामे करतांना सर्व जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्यांनी अंग झोकून केलेल्या कामामुळे विकासाचे नवे पर्व ग्रामीण भागात सुरु झाले त्या विकासाच्या कामाची पोहोच पावती तालुक्यातील सुजाण मतदारांनी मला २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत दिली आहे.यामध्ये कोकमठाणच्या सुजान मतदारांचा देखील वाटा असून कोकमठाणच्या विकासाचा आलेख यापुढेदेखील असाच चढता ठेवणार असल्याचे शेवटी ते म्हणाले आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन दीपक रोहोम यांनी केले तर उपस्थितांचे आभार सुनील लोंढे यांनी मानले.