जाहिरात-9423439946
जयंती,पुण्यतिथी अभिवादन

कोपरगावात संत नरहरी महाराज जयंती उत्साहात साजरी

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

मागील दोन वर्षात सर्व जाती धर्माच्या नागरिकांना समान न्याय देऊन विविध समाजाच्या सभामंडपासाठी निधी दिला आहे.सुवर्णकार समाजाच्या अडचणी सोडविणे हि आपली जबाबदारी आहे.सर्व समाजाला समान न्याय देऊन सर्व समाजाबरोबर सुवर्णकार समाजाचे देखील प्रश्न सोडविणार असल्याचे प्रतिपादन श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे यांनी केले आहे.

संत नरहरी सोनार वारकरी संप्रदायातील प्रथम शैव उपासक होते.पण एकदा शिव आणि विठ्ठल एकच आहेत असा त्यांना साक्षात्कार झाला आणि त्यांनी आपला जीवनमार्ग विठ्ठलमय करून टाकला.रामचंद्र-कृष्णदास-हरिप्रसाद-मुकुंदराज-मुरारी-अच्युत आणि नरहरी नारायण अशी त्यांची वंशपरंपरा सांगण्यात येते कोपरगाव येथे त्यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली आहे.

संत नरहरी सोनार वारकरी संप्रदायातील प्रथम शैव उपासक होते.पण एकदा शिव आणि विठ्ठल एकच आहेत असा त्यांना साक्षात्कार झाला आणि त्यांनी आपला जीवनमार्ग विठ्ठलमय करून टाकला.रामचंद्र-कृष्णदास-हरिप्रसाद-मुकुंदराज-मुरारी-अच्युत आणि नरहरी नारायण अशी त्यांची वंशपरंपरा सांगण्यात येते.त्यांचा जन्म श्रावण शुक्ल १३ ला इ.स.११९३ शके १११५ च्या आसपास पंढरपूर येथे झाला.संत नरहरी सोनार यांची जयंती श्रावण शुद्ध-शुक्ल त्रयोदशी या दिवशी,आणि पुण्यतिथी माघ वद्य तृतीयेला असते.संत शिरोमणी श्री नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त ना.काळे यांनी कोपरगाव येथे संत शिरोमणी श्री नरहरी महाराजांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्या वेळी ते बोलत होते.

सदर प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गंगूले,नगरसेवक गटनेते विरेन बोरावके,मंदार पहाडे,संदीप पगारे,गौतम बँकेचे संचालक सुनील शिलेदार,राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष नवाज कुरेशी,रमेश गवळी,फकीर कुरेशी,दिनकर खरे,राहुल देवळालीकर,संदीप कपिले,संदीप देवळालीकर,प्रकाश भडकवाडे,विलास नागरे,संतोष देवळालीकर,भाऊसाहेब बागुल,अरुण बागुल,शिवाजी देवकर,कृष्णा उदावंत,राजेंद्र कपोते,मनोज विसपुते,जया बाविस्कर,दिपक विसपुते,चंद्रकांत उदावंत,नंदू जाधव,नंदू विसपुते,संजय जळगावकर,अनिकेत भडकवाडे,योगेश उदावंत,सतीश कपिले,महेश उदावंत,तेजस देवळालीकर,पियुष विसपुते,मुकुंद उदावंत,अनिल जाधव आदींसह समाजबांधव बहुसंख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close