जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

इंदिरा गांधी यांचे कार्य उपेक्षीत-खांबेकर

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

देशाच्या धुरंधर एकमेव महिला पंतप्रधान भारतरत्न इंदिरा गांधी यांनी राष्ट्रीय एकात्मतेसाठी प्राणाचे बलिदान दिले. त्यांचे कार्याचा जगाने गौरव केला हे त्रिकाल बाधीत सत्य असतांना केंद्र सरकारने त्यांना पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन करण्यांचे टाळले हा केंद्र सरकारचा कृतघ्नपणा असल्याचा आरोप अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस व माजी नगराध्यक्षा मीनल अशोक खांबेकर यांनी नुकताच केला आहे.

त्यापुढे म्हणाल्या की,लोहपुरूष काँग्रेस सरकारमधील पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती व भारतरत्न इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी ३१ ऑक्टोबर रोजी एकाच दिवशी येते तथापि भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाने केवळ सरदार पटेल यांना विविध वृत्तपत्रे व दूरदर्शनाच्या माध्यमातून व शासकीय स्थावर आदरांजलीचे प्रकटने प्रकाशित केली. त्याबद्दल आनंद वाटतो.तथापि ज्यांनी राष्ट्रीय एकात्मता टिकविण्यांसाठी आपल्या प्राणाची आहूती दिली.अनेक वर्ष पंतप्रधान म्हणून जगात आपले व्यक्तिमत्वाचा ठसा उमटविला.त्या भारतरत्न इंदिराजीचा नावांचा साधा उल्लेख न करणे हे पूर्ण कृतघ्नतेचे लक्षण असल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेस पक्षाने अष्टपैलू पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, प्रभावी महिलानेत्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज तथा बहुजननेते गोपीनाथ मुंडे यांच्या सारख्या अनेक राष्ट्रीय दिवंगत नेत्यांना श्रध्दांजली तथा आदरांजली सभेत पक्ष सामील झाला होता. अशी आठवण मीनल खांबेकर यांनी शेवटी करून दिली आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close