कोपरगाव तालुका
कोपरगावात भूमिगत विज वाहिण्याबाबत सात वर्षांनंतरही महावितरण अधिकाऱ्यांचे मौन
जनशक्ती न्यजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील नागरिकांच्या महावितरण,महापारेषण,एस.टी.महामंडळ,रेल्वे विभाग आदी विभागातील समस्या जाणून घेण्यासाठी आज तहसील कार्यालयात आ.आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घेतलेल्या आढावा बैठकित तालुक्यातील शेतकऱ्यांना रात्रीचा वीज पुरवठा बंद करून दिवसा देण्याबाबत व शहरातील भूमिगत वीज वाहक ताराबाबत सात वर्ष उलटूनही तो प्रश्न मार्गी न लावल्याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते संजय काळे यांनी प्रश्न विचारूनही महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सविस्तर मौन पाळल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी तीव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त केली आहे.
वीज वितरण कंपनीचे अधिकारी आपल्या घरी व कार्यालयात बसून शेतकऱ्यांना रात्रीची वीज देऊन त्यांच्यावर अन्याय करत आहे.व रात्रीच्या सुमारास बिबटे,वाघ,सरपटणारे प्राणी यांचा धोका आहे.ऊद्या शेतकऱ्यांच्या जीविताला धोका झाला तर त्याला जबाबदार कोण ? या शेतकऱ्यांना पूर्ण दाबाने व दिवसा वीज देण्यासाठी तरतूद करावी.अतिरिक्त (स्टॅन्ड बाय) विद्युत रोहीत्रे यांची तरतूद करवून ठेवावी व तातडीने रोहित्र नादुरुस्त झाले तर ते उपलब्ध करून द्यावे-संजय काळे,माहिती अधिकार कार्यकर्ते.
कोपरगावचे आ.आशुतोष काळे यांनी आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास तहसील कार्यालयातील सभागृहात महावितरण,महापारेषण,एस.टी.महामंडळ,रेल्वे विभाग आदी विभागातील समस्या जाणून घेण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थित आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी हा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.
यावेळी पंचायत समिती सभापती पौर्णिमा जगधने,उपसभापती अर्जुन काळे,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, संचालक पद्माकांत कुदळे,अशोक काळे,हरिभाऊ शिंदे,विठ्ठलराव आसने,अरुण चंद्रे,आनंदराव चव्हाण,कोपरगाव जिनिंग व प्रेसिंग सोसायटीचे अध्यक्ष गोरक्षनाथ जामदार,जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे,सुधाकर दंडवते,पंचायत समिती सदस्य श्रावण आसने,मधुकर टेके,समाजसेवक संजय काळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गंगूले,नगरसेवक मंदार पहाडे,संदीप पगारे,गौतम सहकारी बँकेचे संचालक सुनील शिलेदार,सरपंच शशिकांत वाबळे,रोहिदास होन आदींसह संबंधित विभागांचे अधिकारी व नागरिक उपस्थित होते.
सदर प्रसंगी तालुक्यातील शिंगणापूर ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या भूमिगत पुलासह अन्य पुलाचे काम अर्धवट ठेवले असल्याचे लक्षात आणून दिले व पावसाचे पाणी निघून जाण्यासाठी पर्यायी व्यवस्था केली नसल्याबाबत संजय काळे यांनी प्रश्न उपस्थित केला होता.त्यावर आ.काळे यांनी विद्युत पंप बसवून ते पाणी काढून दयावे अशी सूचना केली होती.मात्र त्याला संजय काळे यांनी हरकत घेऊन ते पाणी गटारीद्वारेच काढण्याची व्यवस्था रेल्वेने का केली नाही ? त्या बाबत जाबसाल केला असता त्या रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी उत्तर देण्याआधीच अन्य नागरिकांनी पुढील प्रश्न उपस्थित केल्याने हा प्रश्न टोलवणे या कामचुकार अधिकाऱ्यांना सोपे गेले आहे.या शिवाय कोपरगाव बस आगाराच्या नूतन इमारतीचे काम सुरु असताना त्यात व्यापारी गाळे काढले नसल्याबाबतही संजय काळे यांनी सवाल उपस्थित केला असता बस आगाराचे प्रमुख अभिजित चौधरी यांनी मौन पाळले.त्यावेळी आ.काळे यांनी आपण “बांधा-वापरा-हस्तांतरित करा” (बी.ओ.टी.) वर हे काम करण्याचा विचार असून त्यावर कारवाही करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.त्याला आगार प्रमुख चौधरी यांनी दुजोरा दिला आहे.व उपाध्यक्ष व कार्यकारी संचालक शेखर चन्ने यांनी याबाबत चाचपणीसाठी जिल्हा स्तरावर हा प्रस्ताव पाठवला असल्याचे सांगितले आहे.त्या मुळे गाळे धारकांना दिलासा मिळाला आहे.
दरम्यान वीज वितरण कंपनीचे अधिकारी आपल्या घरी व कार्यालयात बसून शेतकऱ्यांना रात्रीची वीज देऊन त्यांच्यावर अन्याय करत आहे.असा आरोप संजय काळे यांनी केला व रात्रीच्या सुमारास बिबटे,वाघ,सरपटणारे प्राणी यांचा धोका आहे.ऊद्या शेतकऱ्यांच्या जीविताला धोका झाला तर त्याला जबाबदार कोण ? असा रास्त सवाल केला आहे.व या शेतकऱ्यांना पूर्ण दाबाने व दिवसा वीज देण्यासाठी तरतूद करावी.अतिरिक्त (स्टॅन्ड बाय) विद्युत रोहीत्रे यांची तरतूद करवून ठेवावी व तातडीने रोहित्र नादुरुस्त झाले तर ते उपलब्ध करून द्यावे अशी मागणी केली आहे.
या याशिवाय राज्य परिवहन महामंडळ खाजगी विद्यालयांना बस उपलब्ध करून देते मात्र सरकारी व निमसरकारी विद्यालयातील विद्यार्थिनींना मात्र बस का उपलब्ध करून देत नाही.असा निरुत्तर करणारा सवाल विचारला आहे.त्या बाबतही अधिकाऱ्यांनी उत्तर देणे टाळले आहे.गत बैठकीत आ.काळे यांनी प्रश्न विचारल्यावर लगेच त्या अधिकाऱ्याला उभे करून उत्तर देण्याची सक्ती केली होती या वेळी पुन्हा त्या बाबीची उणीव आढळून आली आहे.त्या मुळें काम चुकार व कानकापु अधिकाऱ्यांना हि बैठक सोपी गेली आहे.त्या मुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.