कोपरगाव तालुका
कोपरगाव तालुक्यात कोविड गुन्हे कमी करा-मागणी
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यात कोविड-१९ साथीच्या काळात कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुखपट्या न बांधल्याचे कारणावरून मोठ्या प्रमाणावर नागरिकांवर गुन्हे दाखल झाले असून त्या कारवाईत थोडी सौम्यता आणून दंडात्मक कारवाईत नागरिकांना दिलासा दयावा अशी मागणी कोपरगावचे आ.आशुतोष काळे यांनी आज कोपरगावात आज जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांचेकडे केली आहे.
दरम्यान शहर व तालुका पोलिसांच्या प्रलंबित वसाहतीच्या प्रश्नाबाबत जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालया मार्फत राज्य शासनास प्रस्ताव पाठवावा आपण त्याचा गृहविभागाकडे पाठपुरावा करू व पोलिसांच्या शंभर वर्षांपूर्वीच्या जीर्ण वसाहतीचा प्रश्न लार्गी लावू-आ.आशुतोष काळे.
नगर येथे नव्याने दाखल झालेले नूतन पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी आज कोपरगाव शहर व तालुका पोलीस ठाण्यास सदिच्छा भेट देऊन पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतीचे काम प्रगतीपथावर आहे त्याची पाहणी केली त्या वेळी आ.आशुतोष काळे यांनी त्यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला त्यावेळी हि मागणी केली आहे.
सदर प्रसंगी शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव,शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर,तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल कटके,सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक बोरसे,उपनिरीक्षक सचिन इंगळे,भरत नागरे आदी मान्यवर उपस्थित होते.
त्यावेळी आ.काळे यांनी,”शहरात कोरोनाने नागरिक हैराण झाले आहे.नागरिकांना व्यवसायावर विपरीत परिणाम झाले आहे.त्यामुळे नागरिक मेटाकुटीस आले आहे.अशा परिस्थितीत नागरिकांवर गुन्हे दाखल केल्यास त्याचा आर्थिक भार नागरिकांवर पडतो व पोलीस अधिकारी तर जास्त गुन्हे दाखल करण्याचा लक्षांक दिला असल्याचे सांगतात” असे पोलीस अधिक्षक यांचे निदर्शनास आणून दिले आहे.व त्यातून नागरिकांत ताणतणाव वाढतात त्या ऐवजी दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.व नागरिकांना दिलासा देण्यास सांगितलें आहे.
त्यावेळी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी,”गुन्हे दाखल करण्याचे व कुठलाही लक्षांक दिला नसल्याचे” निदर्शनास आणले असता पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी,”याबाबत असा आदेश पूर्वीचे पोलीस अधीक्षक यांनी दिला होता”हि बाब लक्षात आणून दिली व त्यामुळे कारवाई सुरु होती”.या कडॆ लक्ष वेधले असता आता जिल्हा पोलिस अधिक्षक यांनी,”यापुढे नगरपरिषेदेच्या कर्मचाऱ्यांची मदत घेऊन त्यांना मदतीस एकदा पोलीस कर्मचारी देऊन गुन्हे दाखल करण्याचा व दंडात्मक कारवाईचा हा अतिरिक्त ताण पोलिसानी कमी करावा” असे निर्देश दिले आहे.त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले असले तरी पोलिसांच्या कडक कारवाईने आजपर्यंत कोरोना रुग्ण वाढीला गतिरोध कमी झाल्याचे व नागरिकांनी आपल्या तोंडाला मुखपट्या बांधल्याचे सार्वत्रिक चित्र आहे हे अमान्य करता येणार नाही.
दरम्यान शहर व तालुका पोलिसांच्या प्रलंबित वसाहतीच्या प्रश्नाबाबत आ.काळे यांनी जिल्हा पोलिसांमार्फत राज्य शासनास प्रस्ताव पाठवावा आपण त्याचा गृहविभागाकडे पाठपुरावा करू असे आश्वासन दिले आहे.त्यास पोलीस अधीक्षकांनी दुजोरा दिला आहे.दरम्यान पोलीस अधीक्षकांनी प्रगती पथावरील इमारतीची पाहणी केली व समाधान व्यक्त केले आहे.दोन्ही पोलीस ठाण्याच्या कारभाराची पाहणी करून समाधान व्यक्त केला आहे.त्यावेळी अधिकारी उपस्थित होते.