कोपरगाव तालुका
‘त्या’ गुंह्यातील आरोपी पोलिसानी केले जेरबंद
जनशक्ती न्यूजसेवा
साकुरी-(प्रतिनिधी)
राहाता शहर व तालुक्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री वीरभद्र मंदिरातील वीरभद्र मूर्तीचा मुकुट अज्ञात चोरट्यानी नुकताच रात्रीच्या सुमारास चोरून नेल्याची घटना घडल्याने शहर व तालुक्यात खळबळ उडाली होती.त्याचा तपास पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांनी तातडीने मनावर घेऊन कारवाई करण्याचे आदेश स्थानिक पोलिसांना दिले होते.त्यावर पोलिसानी तातडीने हालचाल करून आरोपींना संगमनेर तालुक्यातील पेमगिरीच्या डोंगरात जेरबंद करून गजाआड केले आहे.त्यामुळे पोलिसांचे राहाता शहर व तालुक्यातील नागरींकांनी कौतुक केले आहे.
या गुंह्यातील सराईत गुन्हेगार हा भास्कर पथवे यांने हा गुन्हा केला आहे असे समजताच पोलिस पथकाने नांदुरी दुमाला येथे जाऊन तपास केला असता पथवे हा पेमगिरी डोंगरावर असलेल्या जंगलात लपून बसला आहे असे समजताच मुसळधार पाऊस सुरू असतानाहि तो बाहेर येत नसल्याने पहाटेच्या वेळी शोधमोहीम सुरू करुन आरोपी भास्कर खेमाजी पथवे याला पोलिसानी जेरबंद करुन ताब्यात घेतले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,”राहता येथील विरभद्र मंदीराच्या मुर्तीचे मुकुट पादुका इतर दागिने असा जवळपास ३८५ हजार रुपये किंमतीचा ऐवज अज्ञात चोराने दरवाजा तोडून नेल्याची फिर्याद अरविंद गाडेकर (वय ५०) यांनी दाखल केली होती. त्या गुन्ह्याचा तपास जिल्हा पोलिस प्रमुख अखिलेश कुमार सिंग अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. दिपाली काळे,उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाघचौरे,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजनबद्ध पद्धतीने तपास करुन मिळालेल्या माहितीच्या आधारे सराईत गुन्हेगार हा भास्कर पथवे यांने हा गुन्हा केला आहे असे समजताच पोलिस पथकाने नांदुरी दुमाला येथे जाऊन तपास केला असता पथवे हा पेमगिरी डोंगरावर असलेल्या जंगलात लपून बसला आहे असे समजताच मुसळधार पाऊस सुरू असतानाहि तो बाहेर येत नसल्याने पहाटेच्या वेळी शोधमोहीम सुरू करुन आरोपी भास्कर खेमाजी पथवे याला पोलिसानी जेरबंद करुन ताब्यात घेतले आहे.त्याला पोलीसी खाक्या दाखवताच आरोपीने चोरीतील सर्व साहित्य व मुद्देमाल शेतात लपवून ठेवलेल्या जमीनींतुन काढून दिला आहे.त्याच्यावर या अगोदर हि कोरठाण खंडोबा,मंदिर पारनेर येथे दोन महिन्यांपूर्वी चोरीचा गुन्हा दाखल असुन त्याच्यावर पारनेर संगमनेर,नाशिक या ठिकाणी चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती जिल्हा पोलिस प्रमुख अखिलेश कुमार सिंग यांनी शिर्डी येथे आयोजन करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे.यावेळी विरभद्र मंदीराच्या वतीने अॅड. रघुनाथ बोठे यांनी पथकांचे अभिनंदन केले आहे.या कारवाईत स.पो.नि.शिशिर कुमार देशमुख,सुनिल चव्हाण,दत्ता हेगडे,मनोज गोसावी,संदीप पवार,शंकर चौधरी,लक्ष्मण खोकले,दिपक शिंदे,योगेश सातपुते, सागर सुलाने,राहुल सोळुंके,मच्छीद्र बर्डे,देविदास काळे,संभाजी कोतकर,श्री धुळे यांनी या तपासात भाग घेतला होता.आणखी कोणी आरोपी या गुन्ह्यात सहभागी आहे का याचा तपास सुरू आहे.