जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आरोग्य

कोपरगाव पुन्हा मोठी रुग्ण वाढ !

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहर व तालुक्यात गत तीन दिवसात शहरातील अनेक मान्यवरांना कोरोनाने गाठला असताना आज कोपरगाव तालुक्यात एकूण २०१ अँटीजन रॅपिड टेस्ट करण्यात आल्या असून त्यात ३९ बाधित आढळले आहे.तर ३३ संशयित रुग्णांना उपचारानंतर घरी सोडून दिले आहे. तर खाजगी प्रयोग शाळेतील १४ असे एकूण बाधित ५३ रुग्ण आढळले असून नगर येथे तपासणी साठी १२ स्राव पाठविले असल्याची माहिती दिली असून वारी येथील पुरुष वय-३१ ते उक्कडगाव पुरुष वय-४१ आदी दोन रुग्णांचे निधन झाले असल्याने कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी कृष्णा फुलसौन्दर यांनी चिंता व्यक्त केली आहे.हि वाढ सर्वाधिक मोठी असल्याचे मानले जात आहे.

नगर जिल्ह्यात बाधित रुग्णांचा आकडा ३३ हजार ८९० वर जाऊन पोहचला आहे.तर आता पर्यंत ५४२ जणांनी आपले प्राण देऊन किंमत चुकवली आहे.कोपरगाव तालुक्यातील गत तीन दिवसातील तीन रुग्ण धरून २६ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे.गत काही दिवसात अनेक प्रमुख मान्यवरांसह एक वसुली विभागातील महिला अधिकारी व एक महिला तर एक पुरुष कर्मचाऱ्यांनाही लागण झाल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.त्यामुळे अधिकची चिंता वाढली आहे.

आज आलेल्या यादीत शहरात ३२ बाधित रुग्णांची संख्या तर ग्रामीण भागात असे २१ रुग्ण बाधित निघाले आहे तरी एकूण रुग्ण ५३ संख्या पाहता नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

आज कोपरगाव शहरात आढळलेल्या उर्वरित बाधित रुग्णांची यादी पुढील प्रमाणे सुभद्रानगर दोन पुरुष वय-१७,११,एक महिला वय-३५, अन्नपूर्णानगर दोन महिला वय-२५,४६,खडकी तीन पुरुष वय-३५,६,३१, तर दोन महिला वय-२१,४६,संभाजी चौक एक महिला वय-३४, टिळकनगर तीन पुरुष वय-१८,३३,५४,एक महिला वय-२७,काले मळा एक महिला वय-४८,जुनी कचेरी एक पुरुष वय-७३,निवारा दोन पुरुष वय-३६,०८,तीन महिला वय-४९,५८,३२,येवला नाका एक पुरुष वय-३८,कर्मवीरनगर दोन पुरुष वय-४६,५८,गांधीनगर एक पुरुष वय-२०,समतानगर दोन पुरुष वय-३,२८,दोन महिला वय-०७,२८,सप्तर्षी मला एक पुरुष वय-३३ आदींचा समावेश आहे.

तर ग्रामीण भागात बाधित असलेले रुग्ण पुढील प्रमाणे बहादरपूर एक पुरुष वय-२५,कारवाडी एक पुरुष वय-२०,उक्कडगाव चार पुरुष वय-१८,६०,०८,७३ व तीन महिला वय-१०,१९,६०,पोहेगाव एक पुरुष वय-२४,एक महिला वय-४७,टाकळी एक पुरुष वय-५३,एक महिला वय-४७,कोळगाव थडी एक पुरुष वय-६२,तर सहा महिला वय-२९,६०,२९,२१,६५,५९ तर चासनळी येथे एक पुरुष वय-५८ आदी रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान आज कोपरगाव तालुक्यात एकूण बाधित रुग्णांची संख्या १४८६ इतकी झाली आहे.त्यात १८२ रुग्ण सक्रिय आहेत,तर आज पर्यंत २६ जणांचे कोरोना साथीने निधन झाले आहे.आजपर्यंत कोपरगाव तालुक्याचा मृत्युदर १.७४ टक्के आहे.आतापर्यंत ०६ हजार २३५ जणांचे श्राव तपासले आहेत यातून बाधित रुग्णांचा दहा लाखाला २४ हजार ९४० इतका आढळला आहे.तर बाधित रुग्ण दर २३.८३ असा आढळला आहे तर आतापर्यंत कोरोनातून उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णाची संख्या १२७८ इतकी झाली आहे.टक्केवारीत हा दर ८६.०० टक्के झाला आहे.दरम्यान या विक्रमी बाधित आकडेवारीमुळे नागरिकांत पुन्हा एकदा भीती निर्माण झाली असली तरी मात्र नागरिकांनी आगामी काळात प्रतिबंधात्मक उपायाबाबत अजून दक्षता घेतल्यास रुग्ण वाढ रोखता येईल असा विश्वास तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते यांनी शेवटी म्हटले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close