जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव नजीक कारची-दुचाकीला धडक,दोन जखमी

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील नगर-मनमाड महामार्गावर असलेल्या जनार्दन स्वामी मंदिरानजिक मारुती अल्टो (क्रं.एम.एच.१७ बी.व्ही.२५४१) या कार वरील चालकाने आपल्या ताब्यातील कार रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत भरधाव वेगाने चालवून आपल्या टी. व्ही.एस.स्पोर्ट या दुचाकीवरून (क्रं.एम.एच.२० ई.ए.५८२१) जाणाऱ्या नवनाथ रामचंद्र कडवे (वय-४५) यांना धडक देऊन त्यांना व त्यावरील फिर्यादी महिला शुभांगी दीपक कांबळे (वय-१८) रा.साकुरी शिव साकुरी ता.राहाता या मुलगी आणि पिता या दोघांना जखमी केल्याची फिर्याद कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात जखमी महिलेने कार वरील अज्ञात चालका विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.हि घटना शनिवार दि.१२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ०७.४१ वाजेच्या दरम्यान घडली आहे.त्यामुळे खळबळ उडाली आहे.कार चालक मात्र घटनेनंतर फरार झाला आहे.

कोपरगाव तालुक्यातील नगर-मनमाड या राज्य मार्गावरून कोपरगाव ते शिर्डी कडे वरील क्रमांकाच्या टी. व्ही.एस.स्पोर्ट या कंपनीच्या दुचाकीवरून फिर्यादी महिला शुभांगी कांबळे व व साक्षिदार वडील नवनाथ कडवे हे जाताना वरील क्रमांकाची मारुती अल्टो या कार वरील चालक याने आपल्या ताब्यातील कार रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून बेभान चालवून फिर्यादी महिलेच्या वडिलांना जोराची धडक दिली व त्यांना गंभीर जखमी करून फिर्यादी महिला व त्यांचे वडील यांचे लहान मोठे सुखापतीस कारणीभूत झाला आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव तालुक्यातील नगर-मनमाड या राज्य मार्गावरून कोपरगाव ते शिर्डी कडे वरील क्रमांकाच्या टी. व्ही.एस.स्पोर्ट या कंपनीच्या दुचाकीवरून फिर्यादी महिला शुभांगी कांबळे व व साक्षिदार वडील नवनाथ कडवे हे जाताना वरील क्रमांकाची मारुती अल्टो या कार वरील चालक याने आपल्या ताब्यातील कार रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून बेभान चालवून फिर्यादी महिलेच्या वडिलांना जोराची धडक दिली व त्यांना गंभीर जखमी करून फिर्यादी महिला व त्यांचे वडील यांचे लहान मोठे सुखापतीस कारणीभूत होऊन वरील क्रमांकाच्या कार सोडून फरार झाला आहे.जखमी नंतर प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी भरती केले आहे.
कोपरगाव शहर पोलिसानी या प्रकरणी आपल्या दप्तरी गु.र.नं.६८४/२०२० भा.द.वि.कलम २७९,३३७,३३८,४२७ मोटार वाहन कायदा कलम १८४,१३४,(अ),(ब) १७७ द्वारे अज्ञात कार चालका विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.ए. एम.दारकुंडे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close