निवडणूक

कोपरगाव निवडणुकीत भुसात भाले मारण्याचे काम सुरू !

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतीनिधी)

   पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यासह अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगावसह १२ पैकी ०४ नगरपरिषद निवडणुका पुढे ढकलल्या असल्याची माहिती आताच हाती आली असून ज्या नगरपंचायतींमध्ये ५० टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली आहे त्या त्या ठिकाणी या निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या असल्याची माहिती हाती आली असून त्याला कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीत यावरून विद्यमान आ.आशुतोष काळे आणि माजी आ.स्नेहलता कोल्हे यांनी एकमेकावर आरोप करून गारूड निर्माण करून मतदारांवर छाप पडण्याचे प्रयत्न सुरू केले असल्याचे उघड झाले आहे.मात्र येथील न्यायिक लढाईचा आणि या स्थगितीचा कोणताही संबंध नसल्याचे उघड झाल्याने दोन्ही गटाकडून हे भुसात भाले मारण्याचे काम सुरू असल्याचे उघड झाले आहे.त्यामुळं मतदारांनी संताप व्यक्त केला आहे.

  

कोपरगावात नगरपरिषद निवडणुकीत माघारीचे दरम्यान उमेदवारांना किमान तीन दिवसांचा कालावधी मिळणे आवश्यक असतांना तो पुरेसा मिळालेला नाही यामुद्यावरून हा गंभीर पेच निर्माण झाला असल्याचे सांगितले आहे.त्यामुळे आ.काळे आणि माजी आ.कोल्हे यांचे एकमेकांवरील आरोप हे भुसात भाले मारण्यासारखे असल्याचे मानले जात आहे.यावरून मतदारांनी नाराजी व्यक्त केली आहे.

    महाराष्ट्रातील २४६  नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींसाठींच्या मतदानाच्या तारखा जाहीर झाल्या आहेत.०२ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.दुसऱ्या दिवशीच म्हणजे ०३ डिसेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे.०४ नोव्हेंबरपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.अशातच राज्यात ज्या ज्या ठिकाणी नगरपरिषदाच्या अध्यक्षपदावरून आक्षेप आहे त्या ठिकाणी सर्वच निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत.पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यासह अहिल्यानगर जिल्ह्यातील १२ पैकी ०४ नगरपरिषद निवडणुका पुढे ढकलल्या आहेत.नगरपंचायतींमध्ये ५० टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेल्याची कबुली राज्य निवडणूक आयोगानं दिली आहे.

आ.काळे यांनी आपल्या समर्थकांना एकत्र करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानात दुपारी 3.40 वाजता एकत्र करून या षडयंत्रामागे विरोधक असल्याचे सांगून अप्रत्यक्ष माजी आ.कोल्हे आणि त्यांचे सुपुत्र विवेक कोल्हे यांच्या माथी या घटनेचे खापर फोडले आहे.

      दरम्यान निवडणूक अधिकाऱ्यांनी तातडीने बैठक बोलवली असून त्याबाबत अधिकृत माहिती प्रसिद्धी माध्यमांना देणार असल्याची माहिती मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी दिली आहे.त्यानंतर खरी दिशा स्पष्ट होणार आहे.मात्र आज उशिरा पर्यंत (सायंकाळी 7.15 पर्यंत) याबाबत अधिक माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.मात्र याबाबत कोपरगावात या मुद्द्यावरून विद्यमान आ.काळे आणि माजी आ.कोल्हे यांच्यात मोठे गारूड सुरू झाले असून याबाबत आ.काळे यांनी आपल्या समर्थकांना एकत्र करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानात दुपारी 3.40 वाजता एकत्र करून या षडयंत्रामागे विरोधक असल्याचे सांगून अप्रत्यक्ष माजी आ.कोल्हे आणि त्यांचे सुपुत्र विवेक कोल्हे यांच्या माथी या घटनेचे खापर फोडले आहे.त्याला कारण कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीत माघारीनंतर माजी आ.कोल्हे गटाच्या उमेदवारांनी कोपरगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयात एक अपील करून त्यात आ.काळे गटाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार ओमप्रकाश कोयटे आणि त्यांच्या तीस नगरसेवक पदाच्या तीस उमेदवारांच्या अपूर्ण प्रतिज्ञापत्रावर व नामनिर्देशन पत्रात खाडाखोड केली असल्याचा आरोप करून त्यांना अपात्र करावे अशी मागणी जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे न्या.डी.डी.अलमले यांच्यासमोर केली होती.मात्र दोन दिवस झालेल्या सुनावणीत ते अपील सपशेल फेटाळण्यात आल्याने माजी आ.कोल्हे गटाच्या नगरसेवक आणि नेत्यांचा मोठा हिरमोड झाला होता.त्याचा संदर्भ जोडून आज आ.आशुतोष काळे यांनी माजी आ.कोल्हे यांच्यावर या घटनेचे खापर त्यांच्या माथी फोडले आहे.व यापूर्वी पाच क्रमांकाच्या तलावाचे कामाचे वेळीही त्यांनी उच्च न्यायालयात याचिका केली होती.कोपरगाव शहरातील 28 रस्त्यांचे काम बंद केले होते.त्यामुळे आ.काळे यांनी समोरची (माजी आ.स्नेहलता कोल्हे यांची)पार्टी ही ‘ खोडा पार्टी ‘ असल्याचा आरोप नाव न घेता केला आहे.

 

माजी आ.स्नेहलता कोल्हे यांनी या आरोपाचा बचाव करण्यासाठी त्यांनी निवडणूक कार्यालयात तातडीने जाऊन सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी महेश सावंत यांना आपल्या समर्थकांसह गाठून सदर निवडणूक नियमितपणे सुरू करावी अशी मागणी करून उत्तर दिले आहे.

   दरम्यान माजी आ.स्नेहलता कोल्हे यांनी या आरोपावर बचाव करण्यासाठी त्यांनी निवडणूक कार्यालयात तातडीने जाऊन सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी महेश सावंत यांना आपल्या समर्थकांसह गाठून सदर निवडणूक नियमितपणे सुरू करावी अशी मागणी केली आहे.आपला आणि नगरपरिषद निवडणूक पुढे ढकलण्याचा कोणताही संबंध नाही असा पलटवार केला असून आपली बोटे सोडवून घेतली आहे.

*पत्रकार नानासाहेब जवरे* यांच्या विश्वसनीय बातम्यासाठी *’न्यूजसेवा‘* वाचा आणि खालील लिंकवर क्लिक करून ग्रुप’मध्ये सामील व्हा.
https://bit.ly/newsseva2025

*न्यूजसेवा* डिजिटल युग डिजिटल बातमी.

   दरम्यान याबाबत आमच्या प्रतिनिधीने संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी,”पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यासह अहिल्यानगर जिल्ह्यातील १२ पैकी ०४ नगरपरिषद निवडणुका पुढे ढकलल्या आहेत.नगरपंचायतींमध्ये ५० टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेल्याची कबुली राज्य निवडणूक आयोगानं दिली आहे.तर कोपरगावात नगरपरिषद निवडणुकीत माघारीचे दरम्यान उमेदवारांना किमान तीन दिवसांचा कालावधी मिळणे आवश्यक असतांना तो पुरेसा मिळालेला नाही यामुद्यावरून हा गंभीर पेच निर्माण झाला असल्याचे सांगितले आहे.त्यामुळे आ.काळे आणि माजी आ.कोल्हे यांचे एकमेकांवरील आरोप हे भुसात भाले मारण्यासारखे असल्याचे मानले जात असून हा तमाशा कधी एकदा संपतो असे मतदारांना झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close